मोठा खुलासा ! काश्मीरचा बडतर्फ DSP दविंदरचा आतंकवादी ‘नवीद’सोबत 7 वर्षापासुन ‘याराना’, दुसर्‍या दहशतवाद्यांना ‘टीप’ देऊन बनला ‘करोडपती’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमधील हिजबुल मुजाहिद्दीन दहशतवाद्यांसह अटक करण्यात आलेला पोलिस अधिकारी दविंदर सिंग (DSP Davinder Singh) ची दिल्लीतील राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी (NIA) चौकशी करत आहे. या दरम्यान आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. दविंदर समवेत हिजबुलचे दोन दहशतवादी देखील पकडले गेले आहेत. त्यातील एक नवीद अहमदला दविंदर गेल्या सात वर्षांपासून ओळखत होता. स्पेशल पोलिस ऑपरेशन (SPO) मधून जात असताना नविदची दविंदरशी भेट झाली आणि त्यानंतर ते दोघेही दहशतवादी कारवायांमध्ये सामील होऊ लागले. तीन वर्षांपूर्वी नवीद अहमदने पोलिसांची नोकरी सोडून हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत प्रवेश केला होता.

दहशतवाद्यांना देत होता माहिती
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, चौकशी दरम्यान दविंदरने सांगितले की स्पेशल पोलिस ऑपरेशन (SPO) दरम्यान नवीद खूप वेळा त्याच्या घरी जात होता. तसेच ऑफिसमध्ये देखील दोन्ही सोबतच रहात होते. दोन्ही एकमेकांना माहितीची देवाणघेवाण करून दहशतवाद्यांपर्यंत पोहोचवत होते. या दरम्यान दोघांनी खूप मोठ्या प्रमाणात पैसे कमविले.

नवीदच्या कुटुंबासोबत देखील दविंदरचे संबंध होते
नवीद २०१७ मध्येच हिजबुलमध्ये सामील झाला होता. त्या काळात तो बडगामच्या चांदपोरा येथे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये तैनात होता. एके दिवशी अचानक तो चार रायफल घेऊन तेथून फरार झाला आणि हिजबुलमध्ये सामील झाला. यानंतरही दविंदर त्याच्याशी सतत संपर्कात होता. तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार यानंतर हे दोघे अ‍ॅपद्वारे बोलत होते. असे म्हटले जाते की नवीद हिजबुलमध्ये सामील झाल्यानंतर दविंदर सतत त्याच्या कुटुंबाची मदत करत होता. बर्‍याच वेळा दविंदरने त्याच्या कुटुंबियांना वाहनांमधून सुरक्षित ठिकाणी पोहोचवले आहे.

नवीद हा खूप खतरनाक दहशतवादी आहे
नवीद अहमद हा हिजबुल मुजाहिद्दीनचा दुसरा सर्वात मोठा सेनापती होता. असे म्हटले जात आहे की काही महिन्यांपूर्वी काश्मीरमध्ये नवीदने ११ ट्रक चालकांची हत्या केली होती. त्याच्यावर काही पोलिसांना ठार मारण्याचा देखील आरोप होता. नवीद विरोधात एकूण १७ एफआयआर नोंदविण्यात आल्या आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like