डॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या व्यावसायिकाकडे मागितली 50 लाखांची खंडणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Gangster Dawood Ibrahim) चा गँगस्टर फहीम मच्छमचने (Fahim Machmach) मुंबईतील घाटकोपरमधील एका बढ्या व्यावसायिकाला धमकावून तब्बल 50 लाखांची खंडणी (50 lakh ransom) मागितल्याची माहिती समोर आली आहे. घाटकोपर पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास खंडणी विरोधी पथकाकडे सोपवला आहे. याप्रकरणी मच्छमचवर गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी 10 जून रोजी गुंड फहीम मच्छमचने (Fahim Machmach) घाटकोपरमधील एका बढ्या व्यावसायिकाला 50 लाखांची मागणी केली होती.
पैसे न मिळाल्यास परिणाम वाईट होतील, अशी धमकी दिली होती.
दरम्यान नोव्हेंबरमध्ये दक्षिण मुंबईतील एका व्यावसायिकाकडून खंडणी (Ransom) मागण्याच्या आरोपाखाली मच्छमच याच्या 3 साथीदारांना पोलिसांनी अटक  केली होती.
मच्छमच हा दाऊद इब्राहिम टोळीतील छोटा शकीलचा साथीदार असल्याचे समजते.
तसेच खंडणीसाठी आलेला फोन कॉल हा एक व्हीओआयपी (VOIP) इंटरनेट कॉल होता.
फहीम मच्छमचच्या आवाजाच्या नमुनाशी तो जुळत नसल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
त्यामुळे स्थानिक टोळी दाऊदचे नाव घेऊन खंडणीची वसुली करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Web Title : dawood ibrahim aide fahim machmach threatened businessman booked extortion case

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Royal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट, कंपनीचा आहे हा प्लॅन