अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हस्तक गँगस्टर एजाज लकडवाला अटकेत, मुंबई पोलिसांनी पटण्यातून घेतलं ताब्यात

पटना : वृत्तसंस्था – अंडरवर्ल्ड डॉन आणि डी कंपनीचा मालक दाऊद इब्राहिमचा जवळचा गँगस्टर एजाज लकडवाला याला मुंबई पोलिसांनी बिहारची राजधानी पटना येथून अटक केली आहे. एजाज हा मुंबईतला सर्वात मोस्ट वॉन्टेड गुंड एकेकाळी छोटा राजनचा उजवा हात मानला जात होता. 2003 मध्ये, बँकॉकमध्ये दाऊदच्या टोळी हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती, परंतु तो बचावला होता. मिळालेल्या माहितीनुसार, तो बँकॉकवरून कॅनडाला गेला आणि बर्‍याच काळासाठी तिथेच होता. अटकेनंतर एजाज लकडवाला याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच छोटा राजन याच्याशी जाऊन मिळाल्यामुळे दाऊद लकडवालावर नाराज होता.

एजाज लकडवाला याची मुलगी सोनिया हिलाही बनावट पासपोर्ट प्रकरणात अटक
एक दिवस आधी, बनावट पासपोर्टवरून परदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नातून एजाज लकडवालाच्या मुलीला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली होती. शुक्रवारी रात्री उशिरा सोनिया लकडवाला उर्फ सोनिया शेख नेपाळच्या विमानात जाणार होती, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि तिची कागदपत्रे तपासल्यानंतर तिला अटक केली आहे.

वर्षाच्या सुरूवातीस, खार येथील एका बिल्डरने एजाज लकडवाला आणि त्याचा भाऊ अकील यांच्याविरूद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता आणि नंतर मार्चमध्ये अकीलला अटक करण्यात आली होती. अ‍ॅन्टी-रिकव्हरी युनिटच्या अधिकाऱ्याने सांगितले कि, ‘अकीलने आम्हाला सांगितले होते की सोनियाकडे बनावट पासपोर्ट आहे आणि ती देशातून पळून जाण्याचा प्रयत्नात आहे. ती आपल्या मुलीसह मुंबई विमानतळावर असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर एका पथकाने इमिग्रेशन अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देत सतर्क केले व त्यांना ताब्यात घेण्यात आले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/