Dawood Ibrahim | अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कराचीमध्येच; भाच्याने दिली तपास यंत्रणांना माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याच्यासह त्याचे कुटुंबीय आणि टोळीतील सदस्यांच्या मालमत्ता, बेनामी संपत्तीतील आर्थिक बाबींशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी (Money Laundering Case) सक्तवसुली संचलनालय (ईडी-ED) तपास करीत आहे. दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) भाचा अलिशाह पारकरकडे (Alisha Parkar) ईडीने चौकशी सुरू केली असून अनेक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. कराचीमध्येच (Karachi) दाऊद असून दाऊदची पत्नी सण-उत्सवाला कुटुंबियांशी संपर्क करत असते असा दावा पारकरने केला आहे. त्या आधारे ईडीने तपास सुरू केला आहे.

दाऊदची बहीण हसीना पारकर (Haseena Parkar) हिने कुर्ला (Kurla) येथील गोवा वाला कपाउंडची (Gowawala Compound) जमीन (Land seized) बळकावली होती. त्यानंतर नवाब मलिक (Nawab Malik) यांनी कमी भावात ही मालमत्ता तिच्याकडून विकत घेतल्याचा आरोप आहे. ईडीने मलिक यांना 23 फेब्रुवारीला अटकही (Arrest) केली असून सध्या ते ऑर्थर रोड कारागृहात (Arthur Road Prison) न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) आहेत. प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ईडीच्या आरोपपत्रातून ही माहिती समोर आली आहे.

ईडीने यापूर्वीही अलिशाहचा जबाब नोंदवला आहे. त्यानुसार,त्याच्या जन्माच्या आधी म्हणजे 1986 पूर्वीच मामा (Dawood Ibrahim) देश सोडून गेला आहे. 1986 पर्यंत ते दक्षिण मुंबईतील डंबरवाला इमारतीच्या (Dumbarwala Building) चौथ्या मजल्यावर राहत होते. दाऊदची पत्नी आणि त्याची मामी मेहजबीन दाऊद इब्राहिम (Mehjabeen Dawood Ibrahim), पत्नीसह ईद, दिवाळी तसेच अन्य सणांच्या दिवशी मैत्रिणींच्या संपर्कात असल्याचे त्याने नमूद केले आहे. दुबईत (Dubai) अलिशाह कुटुंबियांसह असून तो चौकशी पासून दूर राहण्यासाठी तेथेच वास्तव्याच्या तयारी असल्याचेही समोर आले आहे.

Web Title : Dawood Ibrahim | Dawood Ibrahim’s nephew said to ed dawood mama is in karachi

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त