डॉन दाऊदसोबतच्या अफेरबाबत अभिनेत्री मेहविश हयातची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – पाकिस्तानी अभिनेत्री महविश हयातचे संबंध मोस्ट वॉन्टेड डॉन दाऊद इब्राहिम याच्यासोबत असल्याचा खुलासा एका न्यूज चॅनलने केला आहे. ही कथित माहिती समोर आल्यानंतर अभिनेत्री महविश हयातने यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. महविशने ट्विटरवरून तिच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. बुधवारी तिने आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांना ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.

महविश हयात हिने म्हटले आहे की, माझ्या विरोधात जे चुकीचे आरोप लावण्यात आले. त्यावर प्रतिक्रिया देऊन त्याला मला महत्त्व द्यायचं नाही. मला त्यांचा अजेंडा माहित आहे आणि हेही मला माहित आहे की, ते असे का करत आहेत. तसेच मी काश्मीरमधील त्यांची दडपशाहीवर आणि बॉलिवूडच्या खोट्या स्वरुपाचे मुद्दे उचलत राहीन. आणि हो.. पुढील वेळी जर माझं नाव कुणाशी जोडायचं असले तर ते नाव लियोनार्डो डि कॅप्रियो.

सोमवारी एका न्यूज चॅनलने आपल्या एका शोमधून खुलासा केला होता की, दाऊद सध्या पाकिस्तानी अभिनेत्री महाविश महातच्या संपर्कात आहे आणि ही अभिनेत्री आज दाऊदची सर्वात मोठी कमजोरी आहे, असा खुलासा करण्यात आला होता. यावर आता महाविशने खुलासा केला आहे.

महाविशने आपल्या करिअरच्या सुरुवातीला एक आयटम नंबर केला होता. त्यानंतर ती प्रकाशझोतात आल्याचे बोलले जाते. आता दाऊद इब्राहिमच्या संपर्कात आल्याने आज महाविशला मोठमोठे सिनेमे मिळत आहेत. फिल्म इंडस्टिीत तिचे वजन वाढत आहे. त्याचबरोबर तिचे सरकारमध्येही वजन वाढत आहे. 37 वर्षीय महाविश हयातला काही वर्षापूर्वी कोणीही ओळखत नव्हते. मात्र आज ती पाकिस्तानातील मीडियातील लोकप्रिय चेहरा बनली आहे.