डॉन दाऊदला ‘कोरोना’ झाल्याच्या बातमीवर भाऊ अनीसची प्रतिक्रिया, म्हणाला – ‘सेहत एकदम माशाअल्लाह, बढिया चल रहा धंधा’ (ऑडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी त्याचा भाऊ अनीस इब्राहिमने फेटाळून लावली आहे. अनीस म्हणाला की, कोरोना महामारी एक रोग आहे. पण भाऊ दाऊद आणि त्याची पत्नी किंवा त्याचे संपूर्ण कुटुंब संक्रमित झालेले नाही. दाऊद आपला व्यवसाय पाकिस्तान आणि युएईमध्ये चालवत आहे.

दाऊदचा स्टाफ आणि रक्षक क्वारंटाइन केले असल्याचा अहवाल होता
यापूर्वी गुप्तचर संस्थांकडून दाऊद आणि त्याची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आढळले असल्याचा अहवाल आला होता. या अहवालामध्ये या दोघांनाही कराचीच्या लष्करी रुग्णालयात दाखल केल्याचा दावा केला होता. त्यात म्हटले गेले होते की, दाऊदच्या पर्सनल स्टाफला आणि रक्षकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

अनीस म्हणाला- ट्रान्सपोर्ट व्यवसायही सुरु केला
एका वृत्तसंस्थेनुसार, दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिमशी फोनवर संवाद साधला आहे. वृत्तसंस्थेनुसार, अनीस कोठून बोलत होता हे माहित नाही. या संभाषणात अनीस म्हणाला- भाई आणि शकील चांगले आहेत. कोणाचीही कोरोना चाचणी पॉजिटीव्ह नाही. कुटुंबातील कोणताही सदस्य रुग्णालयात भरती नाही. अनीसने सांगितले की, डी कंपनी आपला व्यवसाय पाकिस्तान आणि दुबईमधून चालवत आहे. जेव्हा त्याला युएईच्या लक्झरी हॉटेल आणि पाकिस्तानमधील मोठ्या बांधकाम प्रकल्पाबद्दल विचारले असता तो म्हणाले की, मग काय करू. ट्रान्सपोर्टचा व्यवसाय देखील चालवत आहेत.

भारताने म्हटले होते- अफगाण-पाकिस्तान सीमेवर तस्करी करत आहे डी-कंपनी
भारत सरकारने विविध आंतरराष्ट्रीय एजन्सींना पाठवलेल्या मसुद्यातही म्हटले होते की, डी-कंपनी कराची विमानतळावरून अफगाणिस्तानपर्यंत मोठा ट्रान्सपोर्ट व्यवसाय चालवत आहे. या व्यतिरिक्त कंपनीने ट्रक चालकांची नेमणूकही केली आहे. या माध्यमातून ते अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर हिरोईनची तस्करी देखील करतात.

आयएसआयच्या संरक्षणात दाऊद इब्राहिम कराचीमध्ये राहत आहे : अहवाल
दाऊद इब्राहिम पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयच्या संरक्षणात कराची येथे राहत असल्याचा विश्वास आहे. त्याच्यावर १९९३ च्या मुंबई सीरिअल बॉम्बस्फोटसह विविध आरोप आहेत. मात्र, पाकिस्तानने दाऊद आणि त्याच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीबाबत नकार दिला आहे. १९९४ पासून दाऊद पाकिस्तानमध्ये आहे. त्याची मुलगी महरुखचे लग्न पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद याच्या मुलाशी झाले आहे. डी-कंपनीचा शार्प शुटर, वसुली आणि सट्टेबाजी सिंडिकेटचा प्रभारी छोटा शकील देखील कराचीमध्ये राहतो. त्याच्यासह दाऊदचा भाऊ अनीस १९९० मध्ये चर्चेत आला होता, जेव्हा त्याने संजय दत्तला शस्त्रे दिली होती. त्याच्यावर बॉलिवूड चित्रपटांना फंडिंग करण्याचा आणि क्रिकेट सट्टेबाजीचे सिंडिकेट चालवल्याचा देखील आरोप आहे. काही वर्षांपूर्वी त्याला सौदी अरेबियामध्ये ताब्यात घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या, परंतु भारतीय एजन्सीच्या हाती येण्यापूर्वीच तेथून पळून गेला होता.