देश सोडून पळणार्‍या अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या पुतण्याला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दाऊद इब्राहिमचा भाचा रिजवान कासकर याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. रिजवान हा दाऊदचा मोठा भाऊ इक्बाल कासकरचा मुलगा आहे. इक्बाल कासकर यालाही यापुर्वी खंडणी प्रकरणात अटक केली होती. तो सध्या कारागृहात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छोटा शकीलचा साथीदार अफरोज वदारिया यालादेखील मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी रिजवान कासकर यालाही याच प्रकरणातील तपासासाठी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी बुधवारी रात्री ही कारवाई केली आहे. रिजवान कासकर हा देश सोडून जाण्याच्या तयारीत असताना त्याला अटक करण्यात आली आहे.

रिजवान कासकर हा दाऊदच्या मोठ्या भावाचा म्हणजे इक्बाल कासकर याचा मुलगा आहे. इक्बाल कासकर याला पोलिसांनी यापुर्वी खंडणी मागितल्याप्रकरणी अटक केली आहे. तर तो सध्या तुरुंगात आहे. परंतु त्याच्यानंतर त्याचा मुलगा रिजवान कासकर हा देखील खंडणी उकळण्याचे काम करत होता. त्याला अटक करून मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

 घोरण्याच्या समस्येवर ‘या’ ६ घरगुती उपायांनी ‘कंट्रोल’ करा

बकरीच्या दुधाचे ‘हे’ आहेत आश्चर्यचकित करणारे फायदे, जाणून घ्या

नेहमीच आद्रक चहा पिणे योग्य नाही ; होऊ शकतो ‘हा’ त्रास

 ‘सीसी क्रीम’ म्हणजे काय ? याचा वापर केल्यामुळे होतात फायदे आणि नुकसान

 ‘हे’ फळं खा आणि मधुमेहावर नियंत्रण मिळवा

 कच्ची पपई खाल्याने होतात ‘हे’ ३ फायदे, जाणून घ्या

Loading...
You might also like