दाऊद इब्राहिमचा ‘कोरोना’ व्हायरसमुळं मृत्यू झाल्याची चर्चा, पुष्टी नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कोरोनामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यापूर्वी दाऊद आणि त्याची बायको महजबीन या दोघांच्याही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त आलं होतं. एवढेच नाही तर या दोघांनाही कराचीतल्या लष्करी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं बोललं जात होतं. आता सोशल मीडियावर दाऊदचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. मात्र, दाऊदचा भाऊ असिननं या सगळ्या अफवा असल्याचं एका वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.

दाऊद आणि त्याचं कुटुंबीय कराचीमधल्या अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या भागात राहतात. या भागात लष्करी अधिकाऱ्यांची वसाहत आहे. दाऊदचा भाऊ असिननं असा दावा केला आहे की, त्याचा भाऊ आणि कुटुंबातील सर्व सदस्य पूर्णपणे निरोगी आहेत. त्यामुळं दाऊदचा कोरोनामुळं मृत्यू किंवा त्याला कोरोनाची लागण खरच झाली आहे का ? अशा चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत.

दाऊदचा गार्डस् आणि स्टाफला क्वारंटाईनमध्ये ?
दाऊद आणि त्याच्या बायकोला कोरोना झाल्याच्या वृत्तानंतर त्याच्या गार्डस आणि इतर स्टाफला क्वारंटाइन करण्यात आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र यावर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही आहे. तसेच, पाकिस्तान सरकारकडूनही कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही आहे. यातच आज सोशल मीडियावर दाऊद इब्राहिमचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. या केवळ चर्चा असून त्यात कितपत सत्य आहे, याचा पाठपुरावा केला जात आहे.

कोण आहे दाऊद ?
दाऊदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषीत करण्यात आलं आहे. यानंतर पाकिस्तान त्याला संपूर्ण संरक्षण देत आहे. दाऊद पाकिस्तानात असल्याचे पुरावे भारताने पाकिस्तानला वारंवार दिले होते. मात्र, पाकिस्तानने ते कधीच मान्य केलेलं नाही. 1993 च्या मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर दाऊद पाकिस्तानात पळून गेला होता. तेव्हापासून भारतीय सुरक्षा यंत्रणा त्याच्या मागावर असून तो सगळ्यांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी ठरला आहे. यातच आता कोरोनामुळं तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like