‘अंडरवर्ल्ड डॉन’ दाऊद इब्राहिमच्या 38 वर्षीय पुतण्याचा कोरोनामुळं मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कुख्यात गुंड, मुंबई हल्ल्याचा मुख्य आरोपी दाऊद इब्राहिमच्या पुतण्याचा कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. सिराज कासकर असे त्याचे नाव असून, पाकिस्तानच्या कराचीस्थित रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. तो केवळ ३८ वर्षाचा होता.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सिराज हा दाऊदचा मोठा भाऊ साबिर कासकर याचा मुलगा होता. सिराज हा दाऊतसोबतच कराची येथील क्लिफ्टन भागात कडेकोट बंदोबस्तात आपल्या पत्नीबरोबर राहत असे. सिराजवर अब्दुला शाह गाझी दर्गा येथे दफनविधी पार पडला. त्याच्या मृत्यूची माहिती मुंबई आणि दुबईतील नातेवाईकांना कळवण्यात आली.

दाऊदचा भाऊ साबिर कासकर सुरूवातीला एका टोळीचा म्होरक्या होता. पण १२ फेब्रुवारी १९८१ ला गँगस्टर मन्या सुर्वेने पठाण गँगच्या साथीने साबिरला गोळी घालून ठार केलं. मुंबईवर राज्य करण्याची महत्त्वाकांक्षा राखण्याच्या प्रयत्नात गँगवारचा उगम झाला आणि त्यानंतर त्यातूनच मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये दाऊद कुविख्यात गँगस्टर झाला.