श्रीदेवीच्या मृत्यूमागे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा हात?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूबाबत अनेकांनी आपले तर्क वितर्क मांडले आहेत. काहींच्या मते त्यांचा अपघाती मृत्यू झाला तर काहींच्या मते हा घातपात आहे. परंतु निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त वेदभूषण यांनी श्रीदेवी यांच्या मृत्यूमागे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा हात असण्याची शक्यता व्यक्त करुन या प्रकरणाला नवीन वळण दिले आहे.

वेदभूषण यांची खासगी तपास संस्था आहे. श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर त्यांनी हा घातपात असलण्याची शक्यता व्यक्त केली होती. एवढेच नाही तर वेदभूषण यांनी श्रीदेवी यांचा दुबईतील ज्या हॉटेलमध्ये मृत्यू झाला तेथेही भेट दिली. तसेच श्रीदेवी ज्या खोलीत राहत होत्या त्या खोलीच्या शेजारील खोलीमधील बाथटबची पाहणी केली होती. या पाहणी नंतर त्यांनी बाथटबमध्ये अशाप्रकारे सहजासहजी व्यक्ती बुडू शकत नाही असा दावाही त्यांनी केला होता.

आता याच वेदभूषण यांनी श्रीदेवी यांच्या मृत्यूमागे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा हात असल्याची शक्यता व्यक्त करुन या प्रकरणाला नवीन वळण दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार श्रीदेवी यांच्या मृत्यूमागे दाऊदचा हात असू शकतो. दुबईमध्ये त्याचे मोठे प्रस्थ आहे. दुबईतील प्रिन्स परिवाराशी त्याचे चांगले संबध आहेत. तसेच वेदभूषण यांनी श्रीदेवी यांच्या मृत्यूबाबत काही धागेदोरे मिळावेत यासाठी दाऊदच्या दुबईतील जुमैरा अमिरात या हॉटेलमध्ये वास्तव्य केले होते.

दरम्यान, श्रीदेवी यांच्या मृत्यूचे गूढ उकलावे म्हणून वेदभूषण लवकरच सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करणार आहेत.