‘अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कराचीतच’, एजाज लकडावालाची पोलिसांना माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कराचीतच आहे अशी माहिती एजाज लकडावाला याने दिली आहे. एजाज हा एकेकाळी दाऊदचा सहकारी होता. सध्या एजाज मुंबई पोलीसांच्या ताब्यात आहे. एजाजला अटक केल्यानंतर पहिल्यांदाच त्याने दाऊदबद्दल माहिती दिली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत माहिती दिली आहे.

एजाज लकडावालाची स्वत:ची टोळी आहे. मुंबई पोलीसांसाठी वॉन्टेड असलेल्या एजाजच्या नावे खंडणी, हत्या, दंगल घडवणे असे अनेक गुन्हे आहेत. स्वत:ची टोळी निर्माण करण्यापूर्वी एजाज दाऊदसाठी काम करत होता. पोलीसांच्या अटकेत असलेल्या एजाजची सध्या चौकशी सुरू आहे. या चौकशी दरम्यान त्यानं दाऊद इब्राहिम रहात असलेल्या दोन निवासस्थानांची माहितीही दिली आहे. मुंबई पोलीसांनी एजाजला पाटण्याच्या विमानतळावरून अटक केली असून, त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही बजावली होती.

एजाज लकडावालाविरोधात खंडणी, हत्या असे गुन्हे आहेत. मुंबईसोबतच राजधानी दिल्लीतही त्याच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो कॅनडात वास्तव्य करत होता. 2003 साली बँकॉकमध्ये झालेल्या एका हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याची अफवा पसरवली गेली होती. परंतु एजाज या हल्ल्यातून वाचला होता. यानंतरच तो बँकॉकहून कॅनडाला गेला होता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/