दाऊदच्या हस्तकाचे भिवंडी ‘कनेक्शन’ उघड, ड्रग्स रॅकेटप्रकरणी सराफासह एकाला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे हस्तक मुंबईत ड्रग्स विकून दहशतवादाला आर्थिक पुरवठा करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंमली विरोधी पथकांनी अटक केलेल्या गँगस्टर चिंकू पठाण याच्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे. गेल्या पाच वर्षात तब्बल दीड हजार कोटींचे ड्रग्स विकले गेले होते. या प्रकरणामध्ये सोन्याचा व्यावसायिक विक्रांत उर्फ विकी जैन हा वर्मा आणि चिंकू पठाण यांना ड्रग्ससाठी पैसे पुरवत असल्याचे समोर आले आहे.

मुंबईतील चिंकू पठाणचे ड्रग्स रॅकेटच कनेक्शन उघड करण्यात एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांना यश येत असताना आता या प्रकरणाचे कनेक्शन भिवंडीत पोहचले आहे. भिवंडी शहरातील पद्मानगर भागात राहणाऱ्या रोहित वर्मा याला अमली पदार्थ विक्री प्रकरणी एनसीबीच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने रात्री अटक केली असतानाच, त्याला पैसे पुरवणारा सोन्याचा व्यावसायिक विक्रांत उर्फ विकी जैन हा वर्मा आणि चिंकू पठाण यांना ड्रग्ससाठी पैसे पुरवत असल्याचे समोर आले आहे.

विक्रांत उर्फ विकी जैन रहात असलेल्या भिवंडीतील ब्राहण आळी परिसरातून त्याला स्थानिक पोलिसांच्या मदतीने एनसीबीने ताब्यात घेतले आहे. चिंकू हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हस्तक आणि गँगस्टर करीम लालाचा नातेवाईक आहे. भाजी विक्रेता असलेल्या कुटुंबातील राहुल वर्मा हा मागील दोन वर्षापासून या व्यवसायात असल्याचे बोलले जात आहे. त्याचे हितसंबंध भिवंडी सह ठाणे, मुंबई या भागात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने मागील वर्षभरात मोठ्या प्रमाणावर पैशांची उलाढाल या व्यवसायात केली. त्याला पैसे पुरवणारा सोन्याचा व्यावसायिक विक्रांत उर्फ विकी जैन हा रोहित वर्मा आणि चिंकू पठाण यांना ड्रग्ससाठी पैसे पुरवत असल्याने एनसीबीने त्याला अटक केली.

पुण्यातील साथीदाराच्या घरावर छापा
मुंबई नंतर पुण्यात एनसीबीने छापेमारी केली. शनिवारी ड्रग्स पेडलर चिंकू पठाणच्या पुण्यातील साथीदाराच्या घरावर छापा टाकला. या छापेमारीत एनसीबीच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागल्याचे समजतेय. हिंदी चित्रपटातील हिरो आणि हिरोइन यांना ड्रग्स पुरवणाऱ्या चिंकू पठाण याच्या पुण्यातील सहकाऱ्याच्या घरावर एनसीबीने छेपेमारी केली. राजू सोनावणे नावाच्या सप्लायरवर ही धाड टाकण्यात आली. मात्र राजू सोनावणे हा फरार झाला आहे. पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. तसेच हडपसर आणि आणखी तीन ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या.