दाऊदला मोठा दणका, १४ मालमत्तांचा लिलाव होणार

मुंबई पोलीसनामा ऑनलाईन – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या बहिणीच्या फ्लॅटचा लिलाव २ आठवड्यांपुर्वीच करण्यात आले होते. त्यानंतर आता दाऊदच्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील १४ मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. या सर्व मालमत्ता दाऊदची बहिण हसीना पारकर आणि आईच्या नावे आहेत.

कुख्यात दाऊद इब्राहिम याच्या खेड येथे १४ मालमत्ता आहेत. खेडामधील मुख्य मालमत्ता हसीना पारकरच्या नावे आहे. तर इतर मालमत्ता त्याची आई अमिना बी च्या नावे आहे. तेथे एक तीन मजली बंगला, शिवाय पेट्रोलपंपा साठीचा एक प्लॉट आहे. खेडामधील बंगल्यात तो नेहमी यायचा.

दरम्यान खेडामधील हा बंगला १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर ओस पडला आहे. या सर्व मालमत्तांचा लिलाव अन्टी स्मगलींग एजन्सी करणार आहे. या एजन्सीने पुण्यातील जिल्हा मुल्यनिर्धारण अधिकाऱ्याला दाऊदच्या या मालमत्तांची किंमत ठरविण्यास सांगितले आहे.