नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2016 साली डीसीबी बँकेनं मुंबईत मोबाईल आणि एटीएम कार्ड शिवाय एटीएममधून (ATM) पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जेव्हा देशातील बँकांनी पहिले आधारनं युक्त असलेल्या एटीएमची सुविधा सुरू केली तेव्हापासूनच डीसीबी बँकेनं ही सुविधा सुरू केली. या प्रणालीत फिंगरप्रिंट आणि रेटीना स्कॅनद्वारे बँके खातेदार ओळखले जातात. सध्या डीसीबी बँक आपल्या एटीएम मशीनवर फिंगरप्रिंट ऑथेंटीकेशन सुविधा प्रदान करत आहे.
डीसीबी बँक एटीएममध्ये आधार प्रणाली प्रमाणीकरण सुविधा
जर तुम्ही एटीएमवर गेलात आणि एटीएम कार्ड घरीच विसरला असाल तर काळजी करण्याची गरज नाही. आता वेगवान आणि बदलत्या तंत्रज्ञानामुळं तसंही पैसे काढणं शक्य झालं आहे. भारतातील खासगी क्षेत्रातील डेव्हलपमेंट क्रेडिट बँक (DCB Bank) मध्ये ही सुविधा दिली जात आहे. या बँकेच्या एटीएममध्ये आधार प्रााणीकरण सुविधा उपलब्ध आहे. याच्या मदतीनं ग्राहक बँकेच्या एटीएममधून पैसे काढू शकतात.
फिंगरप्रिंट खातेधारकाची ओळख
यासाठी ग्राहकांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावं. आजकाल बहुतेक ग्राहकांची बँक खाती आधार कार्डसी जोडलेली आहेत. डीसीबी बँकेच्या ग्राहकांना हे कार्ड एटीएम मशीनमध्ये नेण्याची गरज नाही. केवळ फिंगर प्रिंटद्वारे खातेदार ओळखले जातील.