कोरोनासाठी आणखी एका औषधाला मंजूरी, DRDO च्या मेडिसिननं कमी होईल ऑक्सीजनची गरज; जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांदरम्यान शनिवारी एक दिलासादायक बातमी आली आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीआरडीओ) ने कोरोनाच्या उपचारासाठी एका औषधाच्या आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिली आहे. हे औषध डीआरडीओचे इन्स्टीट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाईड सायन्सेस (आयएनएमएएस) आणि हैद्राबाद सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (सीसीएमबी) सोबत मिळून तयार केले आहे. या औषधाला आता 2-deoxy-D-glucose (2-DG) नाव देण्यात आले आहे आणि त्याच्या मॅन्युफॅक्चरिंगची जबाबदारी हैद्राबादच्या डॉ. रेड्डी लॅबोरेटरीजला दिली आहे.

औषधाची क्लिनिकल ट्रायल यशस्वी ठरली आहे. दावा आहे की, ज्या रूग्णांवर याची ट्रायल करण्यात आली, त्यांच्यात वेगाने रिकव्हरी दिसून आली. सोबतच रूग्णांचे ऑक्सीनवरील अवलंबत्व सुद्धा कमी झाले. असाही दावा केला जात आहे की, औषधाच्या वापराने रुग्णांचे कोरोना रिपोर्ट इतर रुग्णांच्या तुलनेत लवकर निगेटिव्ह येत आहे. म्हणजे ते लवकर बरे होत आहेत.

डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी एप्रिल 2020 मध्ये लॅबमध्ये या औषधावर प्रयोग केले होते. प्रयोगात समजले की, हे औषध कोरोना व्हायरसला रोखण्यास मदत करते. या आधारावर डीसीजीआयने मे 2020 मध्ये फेज-सेकंड ट्रायल्स करण्यास मंजूरी दिली होती.

कसे काम करते हे औषध?

हे औषध पावडरच्या स्वरूपात येते, जे पाण्यात मिसळून घेतले जाते. हे औषध संक्रमित पेशींमध्ये जमा होते आणि वायरल सिंथेसिस आणि एनर्जी प्रॉडक्शन करून व्हायरसला वाढण्यास रोखते. याचे वैशिष्ट्य हे आहे की, हे व्हायरसने संक्रमित पेशी ओळखते. हे औषध अशावेळी जास्त उपयोगी ठरू शकते, जेव्हा देशभरात रूग्णांची संख्या लागोपाठ वाढत आहे आणि रूग्णांना ऑक्सीजनची आवश्यकता पडत आहे. दावा केला जात आहे की, या औषधाच्या वापरामुळे रूग्णांना जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये थांबण्याची आवश्यकता नाही.