दिलासादायक ! COVID-19 साठी ‘बायोकॉन’च्या ‘या’ औषधाला मिळाली मंजूरी, मृत्युदर कमी करण्यासाठी ठरू शकतं ‘उपयुक्त’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  बायोकॉन बायोलॉजिक्सला कोविड-19 रूग्णांसाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून मोनोक्लोनल अँटीबॉडी इटोलीवझूमॅबच्या इमर्जन्सी वापरासाठी परवानगी मिळाली आहे. बायोकॉन बायोलॉजिक्सला ही परवानगी केवळ इमर्जन्सी यूज ऑथोरायजेशन (इयूआय) अंतर्गत मिळाली आहे. इटोलीवझूमॅबने कोविड-19 रूग्णांमध्ये सायटोकिन स्टॉर्म्सच्या उपचारात मदत होईल. इटोलीवझूमॅब सायटोकीन स्टॉर्म हेच गंभीररित्या संक्रमित रूग्णांच्या मृत्यूचे प्रमुख कारण आहे.

डीसीजीआयनुसार, या औषधाचा वापर हॉस्पिटल सेट-अपमध्ये केला जाऊ शकतो. सोबतच, उपचार सुरू करण्यापूर्वी रूग्णांना याबाबत माहिती द्यावी लागेल आणि रिस्क मॅनेजमेंट प्लॅनसुद्धा तयार ठेवावा लागेल. परंतु, सध्या बायोकॉन बायोलॉजिक्सकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

इमर्जन्सी युज ऑथोरायजेशनचा अर्थ काय आहे ?

सामान्यपणे ड्रग रेग्युलेटर इमर्जन्सी युज ऑथोरायजेशनची मजूरी तेव्हा देते, जे एखाद्या आजाराच्या उपचाराची खुप गरज असते. ड्रग रेग्युलेटर ट्रायल डेटाची कठोर चाचणी घेते आणि हे ठरवते की, प्रस्तावित औषध सुरक्षित आहे आणि काही प्रमाणात आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी सक्षम आहे. परंतु, ईयूएचा अर्थ मंजूरी मिळणे होत नाही. डिटेल डेटाच्या आधारावरच मंजूरी मिळते.

2013 मध्ये प्लाक सोरायसीस नावाच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी इटोलीवझूमॅबला अलझूमॅब ब्रँड नावाने लाँच केले गेले होते. परंतु, आता या औषधाचा वापर गंभीर कोविड-18 शी झुंज देणार्‍या रूग्णांसाठी सुद्धा केला जाऊ शकतो. बॉयोकॉन लिमिटेड सब्सिडियरीला या औषधाच्या क्लिनिकल ट्रायलसाठी डीसीजीआयकडून मंजूरी मिळाली होती. या औषधाची ट्रायल कोविड-19 रूग्णांवर करण्यात आली आहे.

मुंबई, दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये झाली ट्रायल

बायोकॉन बायोलॉजिक्सचे मुख्य मेडिकल ऑफिसर आणि सीनियर व्हाइस प्रेसीडेंट संदीप अठल्ये यांचा संदर्भ देत लाइव्हमिंटने आपल्या एका रिपोर्टमध्ये लिहिले आहे की, या औषधाच्या विशेष मॅकेनिज्ममुळे सीआरएस किंवा सायटोकीन स्टॉर्मला रोखण्यास मदत होईल. याच कारणामुळे बहुतांश कोविड-19 रूग्णांचा मृत्यू होत आहे. यासाठी मुंबई व दिल्लीच्या अनेक हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल ट्रायल सुरू करण्यात आले आहे.

काय आहे सायटोकिन्स?

सायटोकिन्स एक प्रकारचा सिग्नलिंग पदार्थ आहे, जो शरीराची रोगप्रतिकारशक्ती सोडते. ही प्रक्रिया तेव्हा सुरू होते, जेव्हा मानवी शरीरात एखादी वायरल हालचाल सुरू असते. कोरोना व्हायरस संक्रमणाच्या काही प्रकरणात आढळून आले आहे की, रूग्णाची रोगप्रतिकार सिस्टम आवश्यकतेपेक्षा जास्त सायटोकिन्सचे उत्पादन करते. यामुळे जास्त सूज येण्याची समस्या होते आणि शरीराचे अनेक अवयव काम करणे बंद करतात. यामुळे रूग्णाचा मृत्यू होतो.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like