अजित पवारांची ‘दादा’गिरी ! बैठका घेत निर्णयांचा ‘सपाटा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे अजित पवार हे मॅरेथॉन बैठका घेत त्यांनी कामाचा सपाटा लावला आहे. आज अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री या नात्याने काही महत्त्वाच्या बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेत आपणच या सरकारमध्ये ‘दादा’ असल्याचे दाखवून दिले. वाडिया रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावणे, ईस्टर्न फ्री वेला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देणं आणि राज्यातील गुन्हेगारी संपवण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश देत अजित पवार यांनी प्रशासनावर असलेला आपला वचक दाखवून देत या सरकारमध्ये आपलीच ‘दादा’गिरी असल्याचे दाखवून दिले.

वाडिया रुग्णालयाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. मात्र, या आधीच अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मीला ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत बैठक घेतली. रुग्णालयासाठी 46 कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे सांगत त्यांनी प्रश्न मार्गी लावला. त्यामुळे त्यांनी एक प्रकारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मातच केली. तसेच अनेकदा सार्वजनिक ठिकाणी होणारा वाद पाहता अजित पवार यांनी ईस्टर्न फ्री वेला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देत यामध्येही बाजी मारली. खरेतर हा मार्ग शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत येतो. पण इथेही दादांनी बाजी मारली.

राज्यातील विशेषत: नागपूरमधील वाढत्या गुन्ह्यांची दखल घेत लागेबांधे न पाहता कठोर कारवाई करा असे निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत. असे करत असताना नागपूरच्या आणि आपल्या पक्षाचे गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुखांनाही त्यांच्या खात्यात आपणच ‘दादा’ आणि ‘बॉस’ असल्याचे दाखवून दिले. अजित पवार यांच्या कामाची ही सुरुवात असून आगे आगे देखो होता है क्या अशी चर्चा सध्या सरकारी दरबारात सुरु झाली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like