DCM Devendra Fadnavis | ‘बाबासाहेबांच्या संविधानामुळे चहावाला पंतप्रधान झाला’ – देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – DCM Devendra Fadnavis | आज (६ डिसेंबर) रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 66 वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्ताने राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबईच्या चैत्यभूमीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. खऱ्या अर्थाने आजचा दिवस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याचा आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाची दशा आणि दिशा बदलण्याचं काम केलं. व्यक्तीला समान अधिकार देणारं, कोणामध्येही भेद न करणारं, असं संविधान त्यांनी आपल्या देशाला दिलं. आज आपला देश लोकशाहीमुळे प्रगती करत आहे, जिवंत आहे. सर्वांना ‘एक मार्ग एक संधी’ संविधानाने उपलब्ध करून दिली. त्यांचे आभार मानण्याकरता आपण सगळे जमले आहोत. त्यांचा संदेश जगाच्या कल्याणाचा आहे. चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच झालेलं आहे.”

 

तसेच इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम लवकरच पूर्ण होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
त्याचाही कार्यक्रम लवकरच होईल असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
दरम्यान, दरवर्षी महापरिनिर्वाणदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून चैत्यभूमी येथे अनुयायी येतात.
यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील दादरमधल्या चैत्यभूमीवर भीमसागर उसळला आहे.

 

Web Title :- DCM Devendra Fadnavis | dr babasaheb ambedkar 66th mahaparinirvan din 2022 babasaheb changed the direction and state of the country says devendra fadnavis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Raj Thackeray | ‘आपण महापुरुषांना संकुचित दृष्टिकोनातून पाहतो’; महापरिनिर्वाणदिनी राज ठाकरेंचे जनतेला आवाहन

Nashik ACB Trap | 51 हजारांची लाच स्वीकारताना ठेकेदार पोलिसांच्या जाळ्यात; नाशिकमधील प्रकार

U-19 Women’s T20 WC | शफाली वर्माची Under 19 विश्वचषकासाठी महिला संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती

Aurangabad ACB Tap | लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात