पुणे : DCP Smartana Patil At Bhau Rangari Ganpati | शहरात विविध सार्वजनिक मंडळातील गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळल्याचं चित्र आहे. शहरातील उपनगरांसह ग्रामीण भागातील नागरिक देखावे पाहण्यासाठी कुटुंबासह हजेरी लावताना दिसत आहेत.
पोलीस उपायुक्त (Zone-II) स्मार्तना पाटील यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे भेट देऊन बाप्पांचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीतदादा बालन (Punit Balan) यांच्याकडून पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांचे स्वागत करत त्यांचा सन्मान करण्यात आला.
शहरात मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला जातो. दररोज हजारो भाविक गणेशाच्या दर्शनासाठी येत आहेत. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे बाप्पाच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. (DCP Smartana Patil At Bhau Rangari Ganpati)
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa
हे देखील वाचा