भाजपाला दिल्‍लीचं बँकॉक बनवायचंय का ?, स्पा सेंटरवरून महिला आयोगाचा सवाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्पा केंद्रावर सेक्स रॅकेटवरील कारवाईबाबत एमसीडीवर कठोर भूमिका घेताना दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी दिल्ली भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप करत अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

स्वाती मालीवाल म्हणाल्या की, त्या नेत्याचे नाव जाहीर करा ज्याचा स्पावरील कारवाईला आक्षेप आहे. दिल्ल्लीतील भाजपचे किती नेते स्पा केंद्र चालवत आहेत. स्पा केंद्रावरून दिल्ली भाजपला फ़ंड दिला जातो का ? स्पाबरोबर पर्यटनाचा काय संबंध आहे? भाजपाला दिल्लीचे बँकॉक बनवायचे आहे काय?
आम्ही यापूर्वी अनेक स्पा सेंटरची तपासणी केली होती. बरेच स्पा परवान्याशिवाय चालू होते. हे स्पा सेंटर दिल्ली पोलिस आणि एमसीडीच्या संगनमताशिवाय चालू शकत नाही.

या स्पा सेंटरवर कारवाई करू इच्छित नसलेले दिल्लीतले नेते कोण आहेत? स्पा सेंटर चालविण्यात राजकीय लोकांच्या भूमिकेचीही चौकशी केली पाहिजे. अशी मागणीही त्यांनी केली.

दक्षिण दिल्ली महानगरपालिकेत स्पा सेंटरसाठी सल्लागार जारी करण्यास सांगण्यात आले आहे, पण आता दिल्ली भाजपच्या नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर तेही मागे घेतले. असा आरोपही त्यांनी केला आहे. या आरोपांचे दक्षिण एमसीडीचे माजी महापौर कमलजित सेहरावत यांनी खंडन केले आहे. ते म्हणाले की ,’ कोणताही सल्लागार मागे घेण्यात आला नाही किंवा भाजपाच्या कोणत्याही नेत्याचा फोन आला नाही.’

काही दिवसांपूर्वी स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेट प्रकरणी दिल्लीत चार एफआयआर नोंदविण्यात आल्या असून बर्‍याच मुलींची सुटका करण्यात आली होती. या स्पा सेंटरमध्ये मोठ्या संख्येने कंडोम आणि अश्लील साहित्यही जप्त करण्यात आले होते.

Visit – policenama.com