मुख्यमंत्री खट्टर यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भडकल्या आयोगाच्या अध्यक्षा मालीवाल ; म्हणाल्या, ‘ही भाषा सडक छाप रोमियोंची’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी हरियांनाच्या मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या वक्तव्यावरून टीका केली आहे. मनोहर लाल खट्टर यांनी कलम ३७० हटवल्यानंतर तेथील मुलींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावर स्वाती मालीवाल यांनी मनोहर लाला यांना आपल्या वक्तव्यावर लाज वाटली पाहिजे. मुख्यमंत्रीच रोडछाप रोमियोची भाषा बोलत आहेत, अशी टीका स्वाती मालीवाल यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मिरच्या लोकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत आहेत की पूर्ण देश एकत्र आहे. मात्र एक नालायक मुख्यमंत्री अभद्र वक्तव्य करत लोकांमध्ये हिंसाचाराला पाठबळ देत आहे. यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

शुक्रवारी मनोहर लाल खट्टर यांनी कलम ३७० हटवल्यानंतर आता लग्न करण्यासाठी काश्मिरी मुलींना आणता येईल. आमचे मंत्री ओपी धनखर हे बिहारवरून सुन आणण्यासंदर्भात बोलत असतात. तर आजकाल लोक काश्मिरचा रस्ता साफ झाल्याचे बोलत आहेत. आता काश्मिरवरून मुली आणता येईल, असे वक्तव्य केले होते. मात्र हे वक्तव्य मस्करित केल्याचे सांगत ते तसंच घ्यावे असं मनोहर खट्टर यांनी सांगितले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे चालवली जाणारी बेटी बचाव बेटी पढाओ या योजनेवर बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केले होते. मात्र आता त्यांच्यावर यावरून अनेक स्तरावरून टीका होत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त