मरणाच्या दारात असतानाही डीडीच्या कर्मचाऱ्याचा आईला व्हिडीओ संदेश

रायपूर : वृत्तसंस्था – छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये मंगळवारी (30 ऑक्टोबर) नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला झाला. या हल्ल्यात दूरदर्शनच्या टीममध्ये सामील असलेल्या  मोरमुकुट शर्मचा सहकारी कॅमेरामन अच्युतानंद साहूचा या हल्ल्यात मृत्यू झाला. तर दोन पोलिसही शहीद झाले आहेत. परंतु याच  मोर मुकुट शर्माचा एक व्हिडीआे समोर आला आहे. मरणाच्या दारात असतानाही त्यांनी आईसाठी एक संदेश रेकाॅर्ड केला. अक्षरश: हृदय पिळवटून टाकणारा हा व्हिडीआे आहे. या संदेशामध्ये ते म्हणाले की,  “आई, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आज कदाचित मी जिवंत राहू शकणार नाही. तरी मृत्यू समोर असूनही मला आज भीती वाटत नाही,”  छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये नक्षलवादी हल्ल्यावेळी त्याने हा मेसेज मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता.
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये मंगळवारी (30 ऑक्टोबर) नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला. नक्षल्यांनी पोलीस आणि मीडियावर निशाणा साधला. मीडियाची एक टीम काही पोलिसांसह एका गावाच्या दिशेने जात असताना नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलीस आणि दूरदर्शनच्या एका कॅमेरामनसह तिघांचा मृत्यू झाला. तर मोर मुकुट शर्मा हे मृत्यूच्या दाढेतून बचावले आहेत.
सदर व्हिडीओमध्ये मोर मुकुट शर्मा जमिनीवर पडलेले दिसत आहेत. यादरम्यान त्यांच्या आजूबाजूला सुरु असलेल्या गोळीबाराचा आवाजही ऐकायला येतो. विशेष म्हणजे दूरदर्शनच्या टीमवर हल्ला झाल्यानंतर, काही क्षणातच लायटिंग सहाय्यक मोर मुकुट शर्माने त्याचा मोबाईल काढला आणि आईसाठी एक मेसेज रेकॉर्ड केला. मृत्यू समोर असूनही मला आज भीती वाटत नाही असे ते म्हणाले.