Solapur News : दारफळ सिने येथे DCC बँकेच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या, माढा तालुक्यातील घटना

माढा : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर जिल्हा बँकेत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (मंगळवार) सकाळी उघडकीस आली आहे. ही घटना माढा तालुक्यातील दारफळ सिना येथे घडली आहे. अभिमान साहेबराव उबाळे असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच माढा पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली.

अभिमान उबाळे यांनी दारफळ ते महातपूर रस्त्यावर शिंदे व गुरव यांच्य शेताच्या बांधावर असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत सोमनाथ उबाळ रा. दारफळ सिना यांनी माढा पोलिसात खबर दिली. उबाळे यांनी कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली हे अद्याप समजू शकले नाही.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर माढा पोलिस ठाण्यात पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून दिला आहे. पुढील तपास माढा पोलीस करत आहेत.