‘जा सिमरन जा जिले अपनी जिंदगी’ काजलने पोस्ट केला व्हिडीओ ; DDLJ ला आज पूर्ण झाले 26 वर्ष.
पोलीसनामा ऑनलाईन टीम – ‘दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे’ चित्रपट म्हटलं की चाहत्यांना अमरीश पुरी (Amrish Puri) यांचा चित्रपटातील डायलॉग “जा सिमरन जा जिले अपनी जिंदगी” डोक्यात येतो. 20 ओक्टोम्बर 1995 रोजी डीडीएलजे (DDLJ) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आज डीडीएलजे (DDLJ) चित्रपटाला 26 वर्ष पूर्ण झाली आहेत, त्या संबंधीत काजोल देवगणने (Kajol Devgan) आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरती चित्रपटातील व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांसोबत आनंद शेयर केला आहे.
अमरीश पुरी (Amrish Puri) यांचा डीडीएलजे (DDLJ) चित्रपटातील डायलॉग ‘जा सिमरन जा जिले अपनी जिंदगी’ काजोल देवगणने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरती व्हिडीओ पोस्ट केला आहे खाली लिहीत – “सिमरनने 26 वर्षा पूर्वी ट्रेन पकडली होती, आज देखील तुमच्या प्रेमाचे आम्ही आभारी आहोत. #26 Years Of DDLJ”.
शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री काजोलच्या (Kajol Devgan)
रोमँटिक चित्रपटाने 1995 मध्ये थिएटरमध्ये विक्रमी कमाई केली होती.
20 ओक्टोम्बर 1995 रोजी रिलीज झालेला डीडीएलजे (DDLJ) चित्रपट मुंबई मधील
“मराठा मंदिर” (Maratha Mandir) थिएटर मध्ये गेले 25 वर्ष प्रदर्शित करण्यात आला,
पण गेल्या 2 वर्षात कोरोनाच्या महामारीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात आले आहे.
G7 मल्टिप्लेक्स आणि मराठा मंदिराचे कार्यकारी संचालक मनोज देसाई यांनी पिंकविलाला
सांगितले की ते सकाळी 11:30 च्या शोसाठी दररोज 200 ते 300 लोकांच्या वहिवाटीची नोंदणी करतात.
Web Title :- DDLJ | shahrukh khan and kajol film dilwale dulhania le jayenge completes 26 years
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Cryptocurrency | 500 रुपयांत सुद्धा Bitcoin मध्ये करू शकता खरेदी, विक्रमी स्तरावर आहे दर