धुळे : खंडलाय गावातील विहिरीत हात-पाय बांधलेला मृतदेह आढळला, परिसरात खळबळ

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – खंडलाय गावातील शेतकरी मधुकर पाटील यांच्या विहिरीत अज्ञात व्यक्तीचा हात-पाय बांधलेला मृतदेह आढळ्याने परिसरात एकच खळबळ उडाली. नेमका हा मृतदेह कुणाचा आहे, विहिरीत कोणी फेकला याबाबत परिसरात उलट सूलट चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, शतकरी मधुकर पाटील हे शेतात गेले होते. विहिरीजवळ जाताच त्यांना दोरीने हात-पाय बांधलेला मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. त्यांनी तात्काळ याबाबत पोलीसांना माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी येऊन पाहाणी केली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. ही वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. नागरिकांनी विहिरीजवळ मोठी गर्दी केली. घटनास्थळी नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती. पुढील तपास पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like