जनरल वॉर्डमध्ये ‘कोरोना’ रुग्णाचा ‘मृतदेह’ कित्येक तास पडून, राजवाडी हॉस्पिटलमधील धक्कादायक VIDEO व्हायरल

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –  राज्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दररोज अनेक करोनाचे रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. मुंबईच्या सायन रुग्णालयात मृतदेहाशेजारीच कोरोना रुग्णावर उपचार सुरु असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. आता असाच एक व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ घाटकोपर येथील राजावाडी हॉस्पटलमधील आहे. या व्हिडिओमुळे हॉस्पिटलमधील धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. कोरोना मृतदेह जनरल वॉर्डमध्ये कित्येक तासांपासून पडून असल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

जनरल वॉर्डमध्ये मृत्यू झालेल्या महिलेचा मृतदेह बेडवर पॉलिथिनमध्ये बांधलेल्या अवस्थेत दिसत आहे. तर शेजारच्या बेडवर कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे दिसत आहे. तब्बल 10 ते 12 तासांपासून हा मृतदेह जनरल वॉर्डमध्ये पडून आहे. त्याचबरोबर याच वॉर्डमध्ये शेवटच्या बेडवर आणखी एक मृतदेह असल्याची माहिती देण्यात आली आहे. एकही स्टाफ या मृतदेहांकडे अद्याप फिरकलेला नाही. त्यामुळे इतर रुग्णांमध्ये भीती पसरली आहे. शासकिय रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची मागणी केली जात आहे.

काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी राजावाडी हॉस्पिटलमधील हा धक्कादायक व्हिडिओ #shamefull या हॅशटॅगने ट्विट केला आहे. हे अमानुष कृत्य असून मुंबई महापालिकेने याबाबत दखल घेऊन हॉस्पिटलच्या डीनला निलंबित करायला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सायन रुग्णालयातील कोविड वॉर्डमधील व्हिडिओ व्हायरल झाला होता. या वॉर्डमध्ये मृतदेहाशेजारीच रुग्णावर उपचार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. संबंधित वॉर्डमध्ये चार मृतदेह असल्याचे व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत दिसत होते. त्यानंतर महापालिकेने या प्रकरणाची दखल घेत सायन रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता प्रमोद इंगळे यांची उचलबांगडी केली होती. आता घाटकोपर येथील राजावाडी हॉस्पिटलचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी महापालिका कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like