पाईपमध्ये तरुणीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

नांदेड : पोलीनामा ऑनलाईन (माधव मेकेवाड) – तरुणीचा मृतदेह पाईपमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने देगलूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. देगलूर तालुक्यातील तडखेल जवळ ही घटना काल उघडकीस आली. या तरुणीची अद्याप ओळख पटली नाही.

एका पाईपमध्ये तरुणीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. पोलीस खून प्रकरणात काही पुरावे सापडतात का याचा शोध घेत आहेत. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून देण्यात आला आहे. या तरुणीचा खून करुन जाळण्यात आला का ? किंवा तिला जिवंत जाळण्यात आले याचा शोध पोलिस घेत आहेत.

संबधीत तरुणीचा चेहरा पूर्ण जळाला आहे. त्यामुळे ओळख पटविण्यासाठी अडचणी जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अत्यंत निर्घृणपणे तरुणीचा खुन करण्यात आला आहे. या प्रकरणी देगलूर पोलिसांत अज्ञात आरोपीं विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like