खळबळजनक ! पोलिस निरीक्षकाचा कारमध्ये आढळला मृतदेह, दिल्ली दंगलीचा करत होते तपास

नवी दिल्ली : दिल्ली पोलीसचे एक निरीक्षक शनिवारी येथील केशव पुरमध्ये आपल्या कारमध्ये रहस्यमय स्थितीत मृतावस्थेत सापडले. पोलिसांनी सांगितले की, इन्स्पेक्टर विशाल खानवलकर (45) 1998 बॅचचे अधिकारी होते. ते दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेत कार्यरत होते.

पोलिसांना सायंकाळी 4.20 वाजता माहिती मिळाली की, केशव पुरममध्ये रामपुरा मेन रोडवर कारमध्ये एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडला आहे, ज्यांनतर पोलीस घटनास्थळी पोहचले. मिळालेल्या माहितीनुसार विशाल हे दिल्ली दंगलीच्या तपासातही सहभागी होते. एसीपी रँकचा अधिकारी दिल्ली दंगलीच्या काही प्रकरणांचा तपास करत आहे आणि त्यांना इन्स्पेक्टर विशाल असिस्ट करत होते.

या अधिकार्‍याला पोलीस कर्मचारी बीजेआरएम हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, जेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. एका वरिष्ठ अधिकार्‍यानुसार चौकशीत समजले की, कार सकाळी 11 वाजल्यापासून जवळपासच्या रामपुरामध्ये एका दुकानाच्या बाहेर उभी केली होती. पोलिसांनी सांगितले की, खानवलकर यांच्या कुटुंबाला माहिती देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.