बोअरवेलमध्ये पडलेल्या सुजितचा अखेर ‘मृतदेह’च बाहेर !

तिरुचिरापल्ली : वृत्त संस्था – तामिळनाडुच तिरुचिरापल्लीमध्ये ७० फुट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या सुजीतला वाचविण्याचे सर्व प्रयत्न विफल ठरले. रेक्यु टीमने त्याचा मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढला.
सुजीत विल्सन हा दोन वर्षाचा मुलगा शुक्रवारी दुपारी आपल्या घराच्या मागे खेळत असताना ७० फुट खोल बोअरवेलमध्ये पडला.

याची माहिती मिळाल्यावर त्याला वाचविण्याचे प्रयत्न सुरु झाले. रेस्क्यु टीमने त्याचे ठिकाण लक्षात येऊन त्याच्या बाजूला एक खड्डा खणण्यास सुरुवात केली. सुमारे ४० फुट खोल खड्डा खणण्यात आल्यानंतर तेथून बोअरखेलपर्यंत भुयार खणण्यात आले. हे काम सुरु असतानाच मंगळवारी पहाटे बोअरवेलमधुन दुर्गंध वास येऊ लागला. सुजीत हा श्वास घेऊ न शकल्याने त्याचा मृत्यु झाला.

सुजीतची सुखरुप सुटका व्हावी, यासाठी राहुल गांधी, अमिताभ बच्चन यांच्यासह अनेकांनी टिष्ट्वट करुन प्रार्थना केली होती. रेक्यु टीमने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते शक्य झाले नाही. मंगळवारी सकाळी रेक्यु टीमने डिकंपोज झालेला मृतदेह बाहेर काढून तो सुजीतच्या नातेवाईकांच्या हवाली केला.

Visit : Policenama.com