मांडवगण फराटा येथे महिलेचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

शिक्रापुर : प्रतिनिधी –    शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील भिमा नदीच्या पुलाच्या पुर्व बाजूला एका अनोळखी महिलेचा ( अंदाजे वय ४२वर्षे) सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला असून याबाबत मांडवगण फराटा चे

पोलिस पाटील गंगाधर भाऊसाहेब फराटे यांनी पोलिसांना खबर दिली आहे, याबाबत सविस्तर माहीती अशी की मांडवगण फराटा येथे भीमा नदीचे पुलाचे पूर्व बाजूला योगेश शिवाजी फराटे यांचे शेताचे जवळ भीमा नदीचे पात्राचे कडेला एक अनोळखी अंदाजे ४० ते ४2 वयाची स्री जातीचे महिलेचे पूर्ण सडलेले अवस्थेत मृतदेह मिळुन आला आहे. सदर महिलेच्या अंगावर लाल रंगाचा ब्लाऊज, त्याचेवर काळ्या रंगाची पट्टी असलेले तसेच पिंक रंगाचा परकर त्याला निळ्या रंगाची नाडी असलेली, गळ्यात काळ्या रंगाचे मण्याची पोत त्यामध्ये धातूचे दोन वाट्या, हातात हिरव्या मोरपंखी बांगड्या असे वर्णन असून सदरचे मयत बॉडी ही भीमा नदीत पाण्याचे प्रवाहासोबत वाहत आली असावी असा अंदाज आहे.

सदर मयताचे दिलेल्या वर्णनावरून कोणाला काहीएक माहिती असल्यास तात्काळ शिरुर पोलीस स्टेशन- 02138/222139, मांडवगन फराटा पोलीस दूरक्षेत्र 02137-262133 यानंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांचे मार्गदर्शनाखाली मांडवगण फराटा पोलीस चौकीचे पोलीस हवालदार श्रावण गुपचे, पोलीस कॉन्स्टेबल किरण ढुके, योगेश गुंड, अक्षय काळे हे करीत आहे.