पुणे मनपाच्या परिसरात नग्न अवस्थेत मृतदेह सापडल्याने ‘खळबळ’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात एक धक्कादायक घटना समोर आली. यामुळे पुणे शहरात खळबळ उडाली. पुणे महानगरपालिकेच्या परिसरात एका परप्रांतियाचा मृतदेह आढळला. महापालिका परिसरात धारधार शस्त्राने वार करून परप्रांतिय व्यक्तीचा खून झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. खून झालेल्या व्यक्तीचे नाव सुजन मंडल, वय 30 असल्याचे कळते आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिकेच्या नव्या इमारतीसमोर असलेल्या पादचारी पुलावर एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. त्यांनतर पोलिसांंनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित व्यक्तींना रुग्णालयात दाखल केले. परंतू रुग्णालयात पोहचल्यावर डॉक्टरांनी त्याला मयत असल्याचे घोषित केले.

खून झालेला व्यक्ती सुजन मंडल हा पश्चिम बंगालचा रहिवाशी असल्याचे स्पष्ट झाले. पुणे महानगरपालिकेसमोरील पदाचारी पुलावर हा मृतदेह नग्नावस्थेत पडला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीच्या डोक्यावर धारधार शस्त्रांनी वार करण्यात आले होते. पोलीस पुढील तपास करत आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like