उपाशी बिबट्या शिकारीला निघाला अन्…

कराड : पोलीसनामा आॅनलाइन – दोन दिवसांपासून उपाशी असलेला एक बिबट्या भक्षाच्या शोधात बाहेर पाडला. मात्र, भक्ष्य मिळण्याऐवजी या बिबट्यालाच प्राण गमवावे लागले. एका आडात पडल्याने आणि दोन दिवस कुणाला काहीच न कळल्याने अखेर या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना कराडमधील बामणवाडी येथे घडली. मृत बिबट्याला आडातून बाहेर काढून जागेवरच त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. तो मृत्यूपूर्वी दोन दिवस आधीपासून उपाशी असल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाले.

पंकजासारखी वाघीण विरोधकांना पुरून उरेल : खा. प्रीतम मुंडे

कराड तालुक्यातील कोळे वनपरिक्षेत्रात बामणवाडी येथील ओढ्याच्या काठाला ५० वर्षापूर्वींचा एक आड आहे. या आडाचे पाणी गेल्या काही वर्षापासून वापरले जात नाही. त्यामुळे या भागात माणसांची वर्दळही नसते. आडाच्या आजूबाजूस झाडेझुडपे वाढलेली असून आंब्याची व इतर फळझाडे आहेत. गावातील एक शेतकरी हे आडाजवळच्या शेतात जनावरांना चारा आणण्यासाठी गेले असता त्यांना दुर्गंधी जाणवली. त्यांनी आडाजवळ जावून आडात डोकावून पाहिले. त्यावेळी कोणतातरी मृत प्राणी पाण्यावर तरंगत असल्याचे त्यांना दिसले. आडात अंधार असल्याने कोणता प्राणी आहे, हे समजत नसल्याने त्यांनी गावातील काही लोकांना बोलावले. सर्वांनी निरीक्षण केल्यानंतर तो बिबट्या असल्याचे दिसून आले.

त्यामुळे या घटनेची माहिती पोलीस पाटील संभाजी पवार व स्थानिक वनमजूर अरुण शिबे यांना देण्यात आली. त्यांनी वनविभागात कळविल्यानंतर त्यांनी मृत बिबट्याला बाहेर काढले. वनविभागाने घटनास्थळीच शवविच्छेदन करून शासकीय पंचासमक्ष अंत्यसंस्कार केले. मृत बिबट्या हा मादी जातीचा व दोन ते अडीच वर्षे वयाचा होता. त्याचे वजन ३० ते ४० किलो होते. सर्व अवयव सुस्थितीत होते, अशी माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली.