करदात्यांना दिलासा ! IT रिटर्न भरण्यास मुदतवाढ, जाणून घ्या नवीन तारीख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 31 डिसेंबर 2020 ही आयकर परतावा भरण्याची शेवटची तारीख असल्यानं सर्व्हरवर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळं सोशल मीडियावरून आयकर भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी केली जात होती. यानंतर आता केंद्र सरकारनं करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे.

नोकरदारांसह आता सामान्य माणसांना आयकर भरण्यास 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजेच आता 12 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्थमंत्रालयानं याबाबत घोषणा केली आहे.

ज्यांच्या खात्याचं ऑडिट बाकी आहे अशांसाठी आणि त्यांच्या पार्टनरसाठी 2020-21 चा आयकर भरण्यासाठी 15 फेब्रुवारीची नवीन डेडलाईन देण्यात आली आहे.