कोरेगाव भीमा आयोगाला शासनाकडून ‘अंतिम’ मुदतवाढ

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगल प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या कोरेगाव भीमा आयोगाला शासनाने अंतिम मुदतवाढ दिली आहे. 8 एप्रिल 2020 पर्यंत आयोगाला मुदतवाढ देण्यात आली आहे. तत्पुर्वी आयोगाचे प्रमुख माजी न्यायमुर्ती जयनारायण पटेल यांनी शासनाला नुकतीच आयोग गुंडाळण्याची विनंती केली होती.

कोरेगाव भीमा येथे दोन धर्मात झालेल्या वादातून दंगल उडाली होती. अनेक वाहनांची जाळपोळ आणि दगडफेक प्रकार घडले होते. यात एका तरुणाचा जीवही गेला होता. याप्रकरणी अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

GR

दरम्यान याप्रकरणाची पार्दर्शकपणे चौकशी करण्यात यावी यासाठी निवृत्त न्यायमुर्ती जयनारायण पटेल यांच्या नियंत्रणाखाली चौकशी आयोग नेमला होता. आयोगात 7 कर्मचारी काम करत आहेत.

दरम्यान, आयोगाची 9 फेब्रुवारी 2020 मध्ये संपुष्टात आली होती. त्यापुर्वीच आयोगाचे प्रमुख पटेल यांनी थकलेले पगार, अपुरानिधी तसेच वेगवेगळ्या समस्यांमुळे हा आयोग गुंडाळावा अशी शिफारास शासनाला केली होती. तसेच, आयोगाबाबात सरकारला गांभीर्य नसल्याचे म्हटले होते.

त्यानंतर आता सरकारने आयोगाला मुदतवाढ दिली आहे. 8 एप्रिलपर्यंत ही मुदत वाढ दिली असून, त्यात अंतिम मुदतवाढ असल्याचे म्हटले आहे. तसेच, 8 एप्रिलपर्यंत चौकशी करून आयोगाने त्याचा अहवाल शासनाला सादर करावा, असेही आदेशित करण्यात आले आहे.