कात्रजमध्ये रिक्षाचालकावर प्राणघातक हल्ला

कात्रज : पोलीसनामा ऑनलाइन – रिक्षा नंबरला लावण्याच्या जुन्या वादातून रिक्षाचालकांमध्ये दारू पिण्यासाठी बसल्यावर भांडण झाले. यातूनच एका रिक्षाचालकाला पाठलाग करून दोन ते तीन रिक्षाचलाकांनी सिमेंट गट्टूने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना कात्रज देहूरोड कडे जाणाऱ्या बायपासच्या वळणावर अशोक आनंद सोसायटीजवळ सोमावरी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या घटनेत रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी रिक्षाचालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

संदिप रामदास आरू (४५, आंबेगाव पठार) असे जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. तर जय पाटील व त्याच्या इतर साथीदारांविरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदिप आरू  आणि जय पाटील व इतर आरोपी हे स्वारगेट येथे रिक्षा चालवितात. तेथे रिक्षाचा नंबर लावण्यावरून त्यांच्यात वाद झाले होते. त्यानंतर सोमवारी रात्री ते कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावर आले. तेथे त्यांनी दारू पिली. त्यानंतर त्यांच्यात रिक्षा लावण्यावरून असलेल्या वादातून पुन्हा भाडण सुरु झाले. यावेळी जय पाटील व त्याच्या साथीदारांनी आरू याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्यात जबर भांडण सुरु झाल्यावर हाणामारीत संदिप आरू पळू लागल्याने त्याचा पाठलाग करून त्याला रसत्यावर पडलेल्या सिमेंटच्या गट्टूने जबर मारहाण केली. यात संदिप आरू गंभीर जखमी झाला. त्यानंतर जय पाटील व त्याचे साथीदार तेथून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू पवार व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संदिप आरू याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले. पोलिस जय पाटील आणि त्याच्या साथीदाराचा शोध घेत आहेत.

पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस भरती