Video : ‘सांकेतिक’ भाषेत ‘त्या’ कर्णबधीर पित्यानं साधला तान्ह्या मुलाशी ‘संवाद’, सोशलची मंडळी ‘फिदा’

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – मुलगी आणि वडिलांच्या नात्याबद्दल एका शब्दात सांगात येत नाही. असे असले तरी त्यांच्यातील प्रेम, आपुलकीचे नाते हे अनोखेच असते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. एक कर्णबधीर पिता आपल्या नुकत्याच जन्मलेल्या तान्ह्या बाळाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी तो खाणाखुणांची सांकेतिक भाषेचा वापर करत आहे. आपल्या सांकेतिक भाषेत त्या तान्ह्या मुलीला मीच तुझा बाबा आहे असे सांगत आहे.

अमेरिकेतील बास्केटबॉलपटू रेक्स चॅम्पमनने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओत कर्णबधीर बाबा त्याच्या तान्ह्या मुलीशी खाणाखुणा करून संवाद साधताना दिसतो आहे. 41 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये ही मुलगी तिच्या बाबाकडे पाहात आहे. तिला त्या खाणाखुणा कळतही नाहीत. पण ती लक्षपूर्वक बाबा काय करतो आहे ते पाहात आहे. आपल्या तान्ह्या मुलीला काळजीपूर्वक धरलं आहे. तो तिच्याशी सांकेतिक भाषेतून संवाद साधतो आहे. या खाणाखुणा काय आहेत. हे त्या मुलीला समजलेलं नाही मात्र ती एकटक बाबाकडे पहात आहे. जणू तिचा बाबा काय बोलतो ते तिला समजत आहे.

ट्विटरवर हा व्हिडीओ अनेकवेळा रिट्विट करण्यात आला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. रेक्स चॅम्पमन यांनी जेव्हा हा व्हिडीओ शेअर केला तेव्हा त्याने या व्हिडीओतला बाबा कर्णबधीर आहे आणि तो मुलीशी संवाद साधू पहातो आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्याच्या सांकेतीक भाषेला शब्दरुपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ते असं आहे, मी तुझा बाबा आहे. आय लव्ह यू. तू खूप सुंदर मुलगी आहे. तुझे डोळे खूप सुंदर आहेत. तुझं हास्यही किती सुंदर आहे. मी तुला या उबदार पांघरुणात गुंडाळलं आहे. तू किती गोड मुलगी आहेस, आय लव्ह यू, आय लव्ह यू.

Visit : Policenama.com