‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का, सरकारनं जून 2021 पर्यंत पगार वाढ थांबविली

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सार्वजनिक उपक्रम विभागा (Department of Public Enterprises) ने केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमां (Central Public Sector Enterprises) च्या काही वेतनश्रेणीनुसार वेतन घेणारे अधिकारी व असंघटित पर्यवेक्षकांच्या अतिरिक्त महागाई भत्त्या (Dearness Allowance) ला 30 जून 2021 पर्यंत रोखले आहे.

महागाई भत्त्याचा हप्ता दिला जाणार नाही

डीपीई यांनी गुरुवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘कोविड -19 साथीच्या आजारामुळे उद्भवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सीपीएसईच्या 2017, 2007, 1997, 1992 आणि 1987 आयडीए वेतन पुनरीक्षण मार्गदर्शक तत्त्वांनुसार वेतन घेणाऱ्या कर्मचार्‍यांचा महागाई भत्त्याचा हप्ता दिला जाणार नाही. त्याचे देय 1 ऑक्टोबर 2020 पासून होणार आहे.’

विभागाने म्हटले आहे की यासह 1 जानेवारी 2021 आणि 1 एप्रिल 2021 पासून थकबाकी डीएचा अतिरिक्त हप्ताही दिला जाणार नाही. डीपीईच्या सर्क्युलर मध्ये असे म्हटले आहे की चालू दराने (1 जुलै 2020 पासून प्रभावी) डीए पेमेंट जारी राहील.

डीपीई म्हणाले, ‘येत्या 1 जुलैपासून डीएचा हप्ता केव्हा देण्यात येईल, याचा निर्णय सरकार घेईल. 1 ऑक्टोबर 2020, 1 जानेवारी 2021 आणि 1 एप्रिल 2021 पासून प्रभावी डीएचा दर नंतर पुनर्संचयित केला जाईल.’ डीपीईने स्पष्ट केले की 1 ऑक्टोबर 2020 ते 30 जून 2021 या कालावधीत कोणतीही थकबाकी दिली जाणार नाही. केंद्रीय महागाई भत्ता (सीडीए) वेतनमान असलेल्या सीपीएसई कर्मचाऱ्यांचा डीए दर आधीच बंद केला गेला आहे.