Dearness Allowance | खुशखबर ! केंद्र सरकारने ‘या’ कर्मचार्‍यांचा वाढवला महागाई भत्ता, मंत्रालय वेगळा आदेश जारी करणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्रीय अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) केंद्र सरकारी कर्मचार्‍यांसाठी महागाई भत्ता (Dearness Allowance) 28 टक्के करण्याची ऑर्डर जारी केली आहे. हा आदेश 1 जुलै 2021 पासून लागू होईल. अर्थ मंत्रालयाने सांगितले की, ही ऑर्डर रेल्वे कर्मचारी (Railway Employees) आणि सशस्त्र दलाच्या (Armed Forces) कर्मचार्‍यांवर लागू होणार नाही. यासाठी संबंधीत मंत्रालय वेगळा आदेश (Dearness Allowance) जारी करेल.

केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी डीए (DA) 17 वरून वाढवून 28 टक्के करण्यात आला आहे.
या वाढीत मागील तीन अतिरिक्त हप्त्यांचा समावेश आहे.
मात्र, मागील वर्षाच्या सुरुवातीपासून 30 जून 2021 पर्यंत तो 17 टक्केवर राहील.

रेल्वे आणि संरक्षण मंत्रालय जारी करणार वेगळा आदेश

अर्थ मंत्रालयांतर्गत येणारे डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचर (DoE) ने स्पष्ट केले आहे की,
बेसिक सॅलरीमध्ये स्पेशल सॅलरी सारख्या इतर सॅलरीचा समावेश होणार नाही.
मात्र, रेल्वे कर्मचारी आणि सशस्त्र दलाच्या कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये वाढीची ऑर्डर रेल्वे मंत्रालय (Railway Ministry) आणि संरक्षण मंत्रालयाकडून (Defence Ministry) जारी केली जाईल.
केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी जारी करण्यात आलेला आदेश डिफेन्स सर्व्हिसेस एस्टिमेटद्वारे पेमेंट घेणार्‍या असैन्य कर्मचार्‍यांवर सुद्धा लागू होईल.

कोरोना संकटामुळे डीए वाढीवर लावला प्रतिबंध

डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचरने सांगितले की, डिफेन्स सर्व्हिसेस एस्टिमेटकडून ज्या असैन्य कर्मचार्‍यांना पेमेंट केले जाते, त्यांच्यासाठी अर्थ मंत्रालयाकडून जारी आदेश लागू होईल.
मात्र, रेल्वे कर्मचारी आणि सशस्त्र दलाच्या कर्मचार्‍यांसाठी रेल्वे आणि संरक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात येणार्‍या आदेशानुसार, डीएमध्ये वाढ होईल.
कोरोना पसरल्यानंतर मागील वर्षापासून केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्याच्या वाढीवर प्रतिबंध लावला होता.
तो 1 जुलै 2021 पासून पुन्हा वाढवला आहे.

Web Title : Dearness Allowance | centre increased dearness allowance for railway personnel armed forces rail and defence ministry will issue separate orders

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Unlock | महाराष्ट्र ‘Unlock’ करण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं महत्वाचं विधान; म्हणाले…

Rape Case | 3 लग्न झालेल्या पोलिस कर्मचार्‍याकडून स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

BJP MLA Gopichand Padalkar | …म्हणून भाजप आ. गोपीचंद पडळकरांच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात FIR