Dearness Allowance Hike | ‘या’ कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये होणार 7 % वाढ, पागारातही होणार बंपर वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने (Central Government) 6 वा वेतन आयोग (6th Pay Commission) मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 7 टक्क्यांनी वाढ (Dearness Allowance Hike) करण्याचा निर्णय घेतला आहे. हे असे कर्मचारी आहेत जे सेंट्रल पब्लिक एंटरप्रायझेस म्हणजे CPSE मध्ये काम करतात. तसेच त्यांचा पगार केंद्रीय महागाई भत्त्यानुसार (CAD पॅटर्न) केला जातो. याशिवाय 5 वा वेतन आयोग (5th Pay Commission) मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या देखील महागाई भत्त्यात 12 टक्क्यांची वाढ (Dearness Allowance Hike) केली आहे.

 

अंडर सेक्रेटरी सॅम्युअल हक (Under Secretary Samuel Haque) यांच्या मते, कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2021 पासून आतापर्यंत देण्यात आलेला एकूण महागाई भत्ता हा 189 टक्के इतका आहे. आता तो 196 टक्के एवढा झाला आहे. हे दर सीडीए कर्मचाऱ्यांच्या (CDA staff) बाबतीत लागू असून ज्यांचे वेतन डीपीई (सार्वजनिक उपक्रम विभाग) कार्यालयाच्या मेमोरँडमनुसार (Memorandum) बदलले गेले आहे. महागाई भत्त्याची रक्कम राउंड फिगरमध्ये घेतली जाणार आहे. (DA Hike)

महागाई भत्ता 12 टक्के वाढला
केंद्र सरकार आणि केंद्रीय स्वायत्ता संस्थेच्या इतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महागाई भत्ता 356 टक्यांवरुन 368 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात (Dearness Allowance Hike) आला आहे. हे असे कर्मचारी आहेत जे 5 व्या केंद्रीय आयोगानुसार पूर्व-सुधारित वेतन श्रेणी/ग्रेड वेतनामध्ये आपला पगार घेत आहेत.

 

वाढीचा लाभ 5 वेतन आयोग असलेल्यांना
महागाई भत्ता एक्सपर्ट हरिशंकर तिवारी (Harishankar Tiwari) यांनी सांगितले की,
या वाढीचा फायदा जे 5 व्या वेतन आयोगानुसार वेतन घेत आहेत अशा कर्मचाऱ्यांना होणार आहे.
ज्यांनी मूळ वेतानामध्ये 50 टक्के डीए विलीन करण्याचा लाभ घेतलेला नाही,
अशा CPSE कर्मचाऱ्यांना देय असलेला डीए सध्याच्या 406 टक्क्यांवरुन 418 टक्के करण्यात आला आहे.
ही वाढ 1 जुलै 2021 पासून होण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Dearness Allowance Hike | Dearness allowance hike 6th pay commission central public sector enterprises marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nora Fatehi–Boyfriend | मलाईका अरोरासोबत झाला नोरा फतेहीचा बॉयफ्रेंड रोमँटिक, पाहा व्हायरल व्हिडिओ

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘गेल्या 24 तासात कोरोना’च्या 854 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pravin Tarade- Sarsenapati Hambirrao | ‘सरसेनापती हंबीरराव’चा रक्त उसळवणारा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला; ‘सरसेनापती हंबीरराव’ यांच्या भूमिकेत दिसणार प्रविण विठ्ठल तरडे (व्हिडीओ)

‘या’ Multibagger Penny Stock मध्ये 3 वर्षात 1 लाख रुपयांच्या बदल्यात मिळाले 91 लाख रुपये, 2 रुपयांच्या शेयरचा भाव झाला 196 रुपये