Dearness Allowance Hike | खुशखबर ! ‘या’ सरकारी कर्मचार्‍यांना दुहेरी फायदा; सरकारने वाढवला 14% डीए; 10 महिन्यांचा एरियरही मिळणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Dearness Allowance Hike | सततच्या महागाईचा सामना करणार्‍या रेल्वे कर्मचार्‍यांना (Railway Employee) सरकारने मोठा दिलासा दिला आहे. रेल्वे बोर्डाने (Railway Board) कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात Dearness Allowance (DA) एकाच वेळी 14 टक्क्यांनी वाढ केली आहे. महागाई भत्त्यात ही वाढ (Dearness Allowance Hike) दोन वेळेच्या आधारे करण्यात आली आहे. (7th Pay Commission)

 

10 महिन्यांचा एरियरही मिळणार
यासोबतच ज्या कर्मचार्‍यांना ही डीए वाढ (DA Hike) लागू होणार आहे त्यांच्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे त्यांना 10 महिन्यांची डीए वाढीची थकबाकी (DA Hike Arrear) देण्याचेही सांगण्यात आले आहे. रेल्वे बोर्डाकडून सांगण्यात आले की, 7-7 टक्क्यांच्या दोन भागात ही डीए वाढ 6व्या वेतन आयोगाच्या (6th Pay Commission) अंतर्गत काम करणार्‍या कर्मचार्‍यांना लागू होईल.

 

वाढून 203 टक्के झाला डीए
1 जुलै 2021 पासून महागाई भत्त्यात 7 टक्के आणि 1 जानेवारी 2022 पासून 7 टक्के वाढ करण्यात आली आहे. सध्या सहाव्या वेतन आयोगांतर्गत पगार मिळणार्‍या कर्मचार्‍यांना 189 टक्के डीए मिळत आहे. 1 जुलै 2021 पासून या कर्मचार्‍यांचा डीए 7 टक्क्यांनी वाढून 196 टक्के होईल. त्याचप्रमाणे 1 जानेवारी 2022 पासून 7 टक्के वाढ केल्यावर तो 203 टक्के होईल, जो कर्मचार्‍यांना 10 महिन्यांच्या थकबाकीसह मे महिन्याच्या वेतनात मिळेल. (Dearness Allowance Hike)

रेल्वे कर्मचार्‍यांना दुहेरी फायदा
रेल्वे बोर्डाच्या या निर्णयामुळे कर्मचार्‍यांना दुहेरी फायदा होणार आहे. अर्थ संचालनालय आणि रेल्वे मंत्रालयाच्या मंजुरीनंतर रेल्वे बोर्डाने हा निर्णय लागू केला आहे.
यापूर्वी मार्चमध्ये केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती.
सातव्या वेतन आयोगाखाली पगार मिळालेल्या लाखो कर्मचार्‍यांना याचा फायदा झाला.

 

7 व्या वेतन आयोगात 34% डीए
तीन टक्क्यांच्या वाढीनंतर केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 31 टक्क्यांवरून 34 टक्के करण्यात आला आहे.
या कर्मचार्‍यांचे किमान मूळ वेतन 18 हजार रुपये आहे.
सरकारच्या वतीने 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करून मूळ किमान वेतन 7000 वरून 18000 रुपये करण्यात आले होते.

 

Web Title :- Dearness Allowance Hike | dearness allowance hike indian railways increases 14 percent da will get 10 months arrear 7th pay commission

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tata IPL Final -2022 | आयपीएलच्या फायनल मॅचची वेळ बदलली; किती वाजता सुरु होणार मॅच?; जाणून घ्या

 

Bhangire Pramod alias Nana Vasant | हडपसर मतदार संघातील प्रभाग रचनेवरून शिवसेनेत नाराजी ! माजी नगरसेवक नाना भानगिरे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत मैत्रीपुर्ण लढतीचा इशारा

 

Aba Bagul | राजकारणासाठी प्रभाग रचनेत तळजाई टेकडीवरील ‘ग्रे वॉटर प्रक्रिया’ प्रकल्प पळवला, काँग्रेसचे माजी गटनेते आबा बागुल यांचा आरोप