स्मृतीदिन विशेष : वृत्त निवेदक ते अभिनेत्री स्मिता पाटील 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -आपल्या अभिनयाने सिनेशृष्टीवर आपली अमीट छाप उमठवणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील यांचा आज ३२ वा स्मृतीदिन. त्यांच्या स्मृतीदिना निमित्त त्यांच्या  आयुष्यातील काही गोष्टींना उजाळा देण्याचा हा प्रयत्न.
पुणे दूरदर्शन वृत्त विभाग केले काम 
पुणे दूरदर्शन विभागाच्या  वृत्त विभागात वृत्त निवेदक म्हणून काम करणारी स्मिता सिने जगतात कशी गेली याची हि एक रोचक गोष्ट आहे. वृत्त निवेदक असणाऱ्या स्मिता पाटील वृत्त निवेदनाच्या अगोदर फक्त पाच मिनटे अगोदर त्या कार्यालयात उपस्थित राहत असत. तेव्हा दूरदर्शन वरून बातमी देणाऱ्या वृत्त निवेदिकेस साडी परिधान करण्याचा शिष्टाचार होता. जीन्स घालून येणाऱ्या स्मिता पाटील या वृत्त निवेदन सुरु करण्या अगोदर फक्त पाच मिनिटे जीन्सवर  साडी परिधान करून विना रंगीत तालीम करता वृत्त निवेदन देत असत. त्यांच्या वृत्त निवेदनाला मोहून तेव्हा  दिग्‍दर्शक श्याम बेनेगल यांनी स्मिता पाटील यांना  ‘चरणदास चोर’ या चित्रपटात कास्ट केले. त्‍या चित्रपटात स्मिता फोटोग्राफरची भूमिका करत होत्या.  पुढे त्यांनी काही करणावरून दूरदर्शन वरील वृत्त निवेदनाचे काम सोडले आणि त्यांनी सिनेशृष्टीला जवळ केले.

असे होते स्मिता पाटील यांचे बालपण 
स्मिता पाटील यांचा जन्म १९५५ साली पुण्यामध्ये झाला. स्मिता पाटील यांचे वडील शिवाजीराव पाटील हे चळवळीतील नेते होते त्यांचा राष्ट्रसेवा दलात सक्रिय सहभाग होता.  बालपणी स्मिता पाटील यांना अभिनयाची आवड होती. त्यांनी शाळेत असताना अनेक नाटकात कामे केली होती. स्मिता पाटील त्यांच्या उत्कृष्ठ अभिनयाच्या जोरावर त्यांना थिएटर ॲकॅडमीच्या ‘बीज’ नाटकात सहभाग मिळाला होता. त्यानंतर  वसंत बापट यांच्‍या ‘भारत दर्शन’ या सांस्‍कृतिक कार्यक्रमात हि त्यांनी सहभाग नोंदवला. पुण्याच्या भावे हायस्कुल मध्ये शिकणाऱ्या स्मिता पाटील पुढील शिक्षणासाठी मुंबईला गेल्या. मुंबईच्या एलफिन्‍स्‍टन कॉलेजमध्‍ये एफवायबीए मध्ये शिकत असताना  एक दिवस अचानक त्‍या वृत्तनिवेदिका म्‍हणून मुंबई दूरदर्शनच्‍या पडद्‍यावर बघायला मिळाल्या आणि त्याच छोट्या पडद्याने त्यांना बॉलिवूडचा मोठा पडदा दाखवला.

स्मिता पाटील यांच्या अदाकारीने गाजलेले चित्रपट  
भीगी पलके,’ ‘शक्‍ती,’ ‘बाजार,’ ‘अर्थ,’ ‘मंडी,’ ‘दर्द का रिश्‍ता,’ ‘आज की आवाज,’ ‘पेट,’ ‘प्‍यार और पाप,’ ‘दिलवाला,’ ‘अमृत,’ ‘आखिर क्‍यों,’ ‘अंगारे,’ ‘नजराना,’ ‘आवाम,’ ‘वारिस,’ ‘ठिकाना’ यासारख्‍या चित्रपटांमध्‍ये स्‍मिता यांनी आपल्या  उत्‍कृष्‍ट अभिनयाची छाप उमठवली . तर ‘अर्धसत्‍य,’ ‘सद्‍गी,’ ‘तरंग,’ ‘गिध,’ ‘सुबह,’ ‘मिर्च मसाला’ ऑफबीट चित्रपटात हि त्यांनी अफलातून अभिनय केला आहे.

स्मिता पाटील यांचे इतर भाषांमधील चित्रपट 
स्‍मिता यांनी  ‘भवानी भवाई’ हा गुजराती,’अनुग्रहम’ हा तेलगू,  ‘अश्‍वमेधेर घोडा ‘अकालेर’, आणि  ‘देवशिशू’ ‘ हे बंगाली चित्रपट केले. ‘अन्‍वेषणे,’ ‘कोडुरा’ या चित्रपटात आणि ‘चिदंबरम’ या मल्‍याळम चित्रपटातही स्मिता यांनी काम केले.

स्मिता पाटील यांचे मराठी चित्रपट 
स्मिता पाटील यांनी १० वर्षांच्‍या करिअरमध्‍ये जवळपास ८० हिंदी आणि मराठी चित्रपटांत काम केले होते. त्यांच्या अभिनयाने श्रेष्ठ ठरलेल्या  ‘सामना,’ ‘राजा शिवछत्रपती,’ ‘जैत रे जैत,’ ‘सर्वसाक्षी,’ ‘उंबरठा,’ ‘सूत्रधार’ या चित्रपटांनी रसिकांच्या मनामध्ये अक्षरशा घर केले होते.

ते गाणं लोकांच्या मनात घर करून गेलं
१९८५ मध्‍ये जे. ओम प्रकाश दिग्‍दर्शित केलेल्या चित्रपट ‘आखिर क्यों?’  मध्ये “दुष्मन ना करे दोस्त ने ओ काम किया है।” हे गाणं स्मिता पाटील यांच्यावर चित्रीत झाले होते. त्या गाण्यातील त्यांचा अभिनय आणि त्याला लता मंगेशकरांच्या आवाजाची जोड या दोन्हीच्या जोडमेळामुळे हे गाणे लोकांच्या पसंतीला एवढे उतरले कि लोकांनी तो चित्रपट डोक्यावर घेतला.
https://youtu.be/3t3NTXGXyPA

स्मिता पाटील यांची सिने शृष्टीवर वेगळी छाप आहे. जी छाप कधीही मिटू शकत नाही. त्यांच्या स्मृतीदिना निमित्त त्यांच्या अभिनयाचा आढावा घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. स्मिता पाटील यांचा सहज सोपा सरळ अभिनय लोकांना आपले जगणे चित्रपटात बघण्यास मजबूर करत होता हेच त्यांच्या अभिनयाचे खरे वैशिष्ठ होते.