होय, आपल्या महाराष्ट्रातच घडलंय ! सिनेअभिनेत्री बाळांतिणीचा बाळासह मृत्यू, कारण समजलं तर तळपायाची आग मस्तकापर्यंत ‘नक्की’

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होऊ न शकल्यामुळे सिनेअभिनेत्रीचा नवजात बाळासह मृत्यू झाला आहे. पूजा विष्णू झुंजार (वय 25) असे मृत महिलेचे नाव असून त्यांनी अत्तापर्यंत दोन चित्रपटांत काम केले आहे. सदर घटना हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव (ता. सेनगाव) येथे रविवारी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार , गोरेगाव येथील पूजा यांना गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रात दाखल केले होते . रविवारी पहाटे त्‍यांची प्रसूती झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच बाळाचा मृत्‍यू झाला. त्‍यानंतर पूजा यांची प्रकृती खालावली. त्‍यांना अस्‍वस्‍थ वाटू लागल्‍याने त्‍यांना पुढील उपचारासाठी हिंगोली येथे नेण्याचा सल्‍ला देण्यात आला. मात्र त्यासाठी वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. खासगी रुग्‍णवाहिकेद्वारे हिंगोली येथे नेताना रस्त्यातच त्यांचा मृत्‍यू झाला.

पूजा झुंजार चित्रपट निर्माते विष्णू झुंजार यांच्‍या त्‍या पत्‍नी होत्या. त्यांनी फाल्‍गुनराव जिंदाबाद’, ‘देवी माऊली आम्‍हा पावली’ या चित्रपटात नायिकेची भूमिका केली होती.

Visit  :Policenama.com

You might also like