पोलिस स्टेशनजवळच युवकाचा खून, परळी शहरात प्रचंड खळबळ

परळी : पोलीसनामा ऑनलाइन – परळी शहर पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर आज (सोमवार) सकाळी रक्ताच्या थारोळ्यात एका तरूणाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून हा खून मध्यरात्री करण्यात आला असल्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे. तरुणाचा खून कोणी आणि कोणत्या कारणामुळे केला हे अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. अनिल हलगे (वय-२२ रा. गणेशपार, परळी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल हा दोन महिन्यांपासून लातूर येथे कामास होता. तो काही दिवसांपूर्वी कामानिमित्त परळीमध्ये आला होता. आज तो लातूरला परत जाणार होता. मात्र, आज सकाळी त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. अनिल याच्या डोक्यात अवजड वस्तू मारून खून करण्यात आला आहे. तसेच त्याच्या अंगावर मारहाणीच्या आणि गळा आवळल्याच्या खुणा दिसत आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अनिलचा मृतदेह उपजिल्हारुग्णालयात पाठवण्यात आला. अनिलच्या खूनाची माहिती मिळताच त्याच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी रुग्णालयात धाव घेतली आहे. अनिल हा त्याच्या आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. पुढील तपास परळी पोलीस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like