Death In Police Custody Case | आरोपीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 7 जणांवर गुन्हा दाखल

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Death In Police Custody Case | चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीला पोलिसांनी (Maharashtra Police) बेदम मारहाण (Police Beating) केली. यामध्ये संशयित आरोपी भीमा राजा काळे (Bhima Raja Kale) याचा मृत्यू झाला. पोलिसांनी (Solapur Police) पोलीस कोठडीत बेदम मारहाण केल्याने गंभीर जखमी झालेल्या भीमा काळेचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये (Civil Hospital) उपचारादरम्यान मृत्यू झाला (Death In Police Custody Case). पोलिसांच्या मारहाणीमुळेच काळे याचा मृत्यू (Solapur Crime) झाल्याचा खुलासा करीत पुणे सीआयडीने (Pune CID) विजापूर नाका पोलीस ठाण्याचे (Bijapur Naka Police Station) तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील (Senior Police Inspector Uday Singh Patil), सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ (API Shitalkumar Kolhal), पोलीस कर्मचारी श्रीरंग खांडेकर (Shrirang Khandekar), शिवानंद भीमदे (Shivanand Bhimde), अंबादास गड्डम (Ambadas Gaddam), लक्ष्मण राठोड (Laxman Rathod) व आतिश पाटील (Atish Patil) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यासह सात जणांवर गुन्हा (Solapur Crime) दाखल झाल्याने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

काय आहे प्रकरण ?
माढा तालुक्यातील (Madha Taluka) कुर्डूवाडी येथील पारधी वस्तीवर राहणारा भीमा काळे याची दुचाकी पोलिसांना विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडली. त्याच ठिकाणी चोरी झाली होती. काळे यानेच चोरी केल्याच्या संशयावरुन पोलिसांनी भीमा काळे याला जिल्हा कारागृहातून (District Jail) न्यायालयात हजर केले. चोरीच्या गुन्ह्याचा (Theft) अधिक तपास करण्यासाठी न्यायालयाने 22 ते 25 सप्टेंबर अशी तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली. यानंतर 22 सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमरास संशयित आरोपी (Suspect Accused) काळे याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी तो लंगडत होता आणि त्याच्या पायाला काळसर रंगाचे वळ होते. (Death In Police Custody Case)

वरिष्ठांनी योग्य मार्गदर्शन केले नाही
संशयित आरोपी भीमा काळे याने गुन्ह्याची कबुली द्यावी आणि गुन्ह्यातील मुद्देमाल परत करावा यासाठी सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ, पोलीस कर्मचारी श्रीरंग खांडेकर, शिवानंद भीमदे, अंबादास गड्डम, लक्ष्मण राठोड व आतिश पाटील यांनी काळे याला बेदम मारहाण केली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी तपास अधिकारी (Investigating Officer) व कर्मचाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले नाही, असे सीआडीने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

 

सीसीटीव्ही लावले नाहीत
याशिवाय न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आरोपीच्या खोलीत व सर्व पक्षांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Cameras) लावणे बंधनकारक होते. परंतु आरोपीच्या कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावलेले नव्हते, आरोपीला उपचाराची गरज असताना त्याकडे हेतुपरस्सर दुर्लक्ष केले गेले. आरोपी हा आजारी असताना व मानसिकदृष्ट्या सक्षम नसतानादेखील त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. भीमा काळे याला 24 सप्टेंबर रोजी उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान 3 ऑक्टोबर रोजी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पत्नीसह नातेवाईकांनी पोलिसांवर आरोप केले.

7 जणांवर गुन्हा दाखल
भीमा काळे याच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले.
पोलीस कोठडीत असताना आरोपीचा मृत्यू झाल्याने या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे गेला.
त्यांच्या तपासानंतर आरोपीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुण्याच्या भरारी पथकाचे उपअधीक्षक गौतम दिघावकर (Pune Deputy Superintendent Gautam Dighavkar) हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

 

एपीआय कोल्हाळ यांच्या अडचणीत वाढ
विजापूर नाका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ हे सध्या विजापूर रोडवरील आर्केस्ट्रा बारच्या (Orchestra Bar) कारवाई दरम्यान तेथील सीसीटीव्ही डीव्हीआर गहाळ केल्याच्या आरोपावरुन निलंबित आहेत.
त्यांची चौकशी सुरु असून मागील महिन्यात पोलीस आयुक्त हरीश बैजल (CP Harish Baijal) यांनी अद्यापही रुजू करुन घेतले नाही.
त्यातच आता या गुन्ह्यामुळे कोल्हाळ यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.

 

आरोपीच्या मृत्यूपूर्वीच उपचाराची गरज होती
चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या भीमा काळे याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली होती.
यानंतर त्याला ताप, सर्दी, खोकला, उलट्या होत असल्याने पोलीस कोठडी संपण्याच्या शेवटच्या दिवशी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र, त्यापूर्वी काळे हा लंगडत चालत होता. तरी देखील तपास अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना विरष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिल्या नसल्याचे दिसते, असा ठपका सीआयडीने ठेवला आहे.
तत्पूर्वी आरोपी काळे याला 22 सप्टेंबर रोजीच उपचाराची गरज होती.
मात्र, त्याला चार दिवसांनी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

 

Web Title :- Death In Police Custody Case | criminal death in police custody case filed against 7 persons including senior officers of solapur city police

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा