खजिन्यासाठी खोदला खड्डा मात्र दोघांना ‘शर्थी’मुळं गमवावा लागला आपला जीव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – खजिना मिळवण्यासाठी काही मित्रांमध्ये पैंज लागली की, जो हा खड्डा खोदेल, त्याला दहा हजार रुपये एकमेकांना द्यावे लागतील. जेव्हा खड्डा खोदला गेला, तेव्हा पैसे द्यावे लागू नये, म्हणून तीन जणांना जलेबी आणि प्रसादमध्ये विष मिसळून देण्यात आले, ज्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. हा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील आहे.

खजिन्याच्या प्रकरणात दोन मृत्यूंचे गूढ सोडवत भिंड येथील मऊ पोलिस ठाण्याने तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीविरूद्ध खुनाचा गुन्हादेखील दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 11 सप्टेंबर रोजी मऊ पोलिस स्टेशनला मदनपुरा गावाजवळ शेतात खजिना शोधण्याच्या प्रयत्नात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. मऊ पोलिस स्टेशन परिसरातील मदनपुरा गावाजवळ शेतात एका व्यक्तीचा मृतदेह सापडला, तर दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह गोहड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळला. होतम सिंह आणि उमेश सिंह अशी मृतांची नावे आहेत तर लक्ष्मण सिंह नावाचा आणखी एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत सापडला होता.

लक्ष्मणसिंगला शूध्द आल्यावर त्याने पोलिसांना सांगितले की, ते लोक खजिना शोधण्यासाठी गेले होते, परंतु अचानक प्रकृती खालावली आणि होतमने प्राण सोडले, तसेच लक्ष्मण स्वत: बेशूध्द झाला. त्याला उमेशच्या मृत्यूबद्दल माहित नव्हते, परंतु खजिना मिळवण्यासाठी खड्डा खणण्यापूर्वी त्याच्याबरोबर आणखी तीन माणसे होती ज्यांनी प्रार्थना केली होती आणि लाडू व जलेबी खायला दिली होती, असेही त्याने सांगितले. पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि अन्य तीन जे खजिना शोधण्यासाठी होतम, उमेश आणि लक्ष्मण यांच्यासह गेले होते त्यांचा शोध लागला. पोलिसांनी रामदास गुर्जर, थानसिंग कुशवाह आणि खलीफासिंग कुशवाह यांना पकडले.

चौकशी दरम्यान या तिघांनी सांगितले की, खोदण्यापूर्वी होतम आणि उमेशने खलिफशी पैंज लावली होती की, जर होतम आणि लक्ष्मणने खजिन्यासाठी खड्डा खोदला तर खलीफ त्याला 10,000 रुपये देईल. जर खड्डा खोदू शकला नाही तर होतमला खलिफला 10 हजार रुपये द्यावे लागतील. पैज लावल्यानंतर होतम आणि लक्ष्मण यांनी खजिन्यासाठी 5 फूट खोल खड्डा खणला. पैंजनूसार आता 10,000 रुपये द्यावे लागतील, असे जेव्हा खलिफाला समजले, तेव्हा तो आपल्या साथीदारांसह प्रसाद घेण्यासाठी गेला आणि वाटेत प्रसादात विष मिसळले.

जेव्हा तो खड्ड्याच्या ठिकाणी पोहोचला, त्याने तेथे प्रथम पूजा केली. त्यानंतर लक्ष्मण, उमेश आणि होतम यांना प्रसाद म्हणून लाडू व जलेबी खायला दिली, त्यानंतर तिघांची प्रकृती खालावली. होतम चा जागीच मृत्यू झाला तर लक्ष्मणने कमी लाडू व जलेबी खाल्ल्यामुळे तो बेशूध्द झाला. उमेश तिथून निघून गेला आणि काही अंतर गेल्यावर उमेशही मरण पावला. याप्रकरणी पोलिसांनी खलिफा कुशवाह, थानसिंग कुशवाह आणि रामदास गुर्जर यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली.

दरम्यान खलिफा कुशवाहाचे म्हणणे आहे की, त्याने लाडू आणि जलेबीमध्ये फक्त धतूराची बियाणे मिसळली होती आणि धतूराच्या बियाण्यापासून मनुष्यच केवळ काही काळ बेशुद्ध होतो, मृत्यू होत नाही, पण पोलिसांनी सांगितले की, या तीन जणांनी लाडू आणि जलेबीमध्ये विष मिसळल्यामुळे उमेश आणि होतम यांनी आपला जीव गमावला.