आंबे वेचण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय चिमूरडीचा शॉक लागून मृत्यू

मावळ : पोलीसनामा ऑनलाईन – भावंडांसोबत आमराईत आंबे वेचण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना तळेगाव इंदूरी येथील पिंजन मळा येथे उघडकिस आली.

पिंकी केदारी असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे, याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात आमराई मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंकी केदारी ही मुलगी आपल्या दोन भावंडांसोबत आंबे वेचण्यासाठी इंदोरीतील पिंजण मळ्यात गेली होती. त्यावेळी आमराईला लावलेल्या संरक्षण तारांमध्ये असलेल्या विजेचा धक्का लागून तिचा जागेवरच मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मात्र तो अद्याप फरार आङे.