निवडणुकीचे काम करत असतानाच पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणुकीचे काम करत असतानाच निवडणूक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. भगवान वाघमारे असे त्यांचे नाव आहे. महापालिका लिपिक म्हणून ते कार्यरत होते. मतदान केंद्रात काम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील उद्या मतदान होणार आहे. दरम्यान निवडणुकीचे काम करत असलेले उल्हासनगर महापालिकेत शिपाई पदावर कार्यरत असलेले भगवान मगरे सकाळी निवडणूक साहित्य घेतल्यानंतर कॅम्प नं-३ सी ब्लॉक येथील मीनल अर्जुन चव्हाण विद्यालयात निवडणूक मतदार केंद्र ८७ मध्ये भगवान मगरे सहकाऱ्यांसोबत गेले होते. दुपारी मतदारसंघात निवडणुकांसाठीचे काम करीत असतांना, त्यांना हृदयविकाराचा झटका आला. अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने मगरे बेशुद्ध पडले. त्यावेळी सहकाऱ्यांनी मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासाअंती मृत घोषित केले.

त्यावेळी ही संपूर्ण माहिती निवडणूक निर्णय अधिकारी, पालिका आयुक्त, पोलीस आणि कुटुंबाला देण्यात आली. त्यानंतर, हृदयविकाराच्या झटक्याने भगवान मगरे यांचा मृत झाल्याचे सांगून पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. दरम्यान, उल्हासनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.