Coronavirus : ‘कोरोना’मुळे जालन्यात कर्तव्यदक्ष पोलिसाचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन – जालन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनामुळे पोलिसाचा पहिला बळी गेला आहे. जालन्यातील एका पोलीस हवालदाराचा कोरोनामुळे औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सुनील सुर्वे असे पोलीस हवालदाराचा नाव असून ते बॉम्ब शोधक व नाशक पथकात कार्यरत होते. सुर्वे हे आंतरजिल्हा चेकपोस्टवर कोरोना ड्युटीवर असताना 1 जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा कोविड रुग्णालयातून औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. याठिकाणी उपचारादरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. जिल्ह्यातील कोरोनाबधितांचा आकडा आता 1 हजार 47 वर पोचला असून आतापर्यंत 40 जणांचा बळी गेला आहे. दरम्यान, पोलिसाचा कोरोनामुळे बळी गेल्याने जालन्यातील पोलिस दलात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like