उन्नाव बलात्कारातील पीडितेचा मृत्यू, न्याय न मिळाल्याने आत्मदहनाचा केला होता प्रयत्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उन्नाव बलात्कारातील पीडितेने पोलीस अधीक्षक कार्यलयाच्या बाहेर स्वतःला पेटवून घेतले होते, शनिवारी रात्री पीडितेचा मृत्यू झाला. तक्रार दाखल करूनही पोलिसांकडून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे पीडितेने 16 डिसेंबर रोजी पोलीस कार्यालयाबाहेर स्वतःला पेटवून घेतले होते. ज्यामध्ये पीडिता 80 % जळाली होती. कानपूरच्या लाला लजपत राय हॉस्पिटलमध्ये पीडितेचा इलाज सुरु होता. शनिवारी रात्री पीडितेने अखेरचा श्वास घेतला.

पीडितेने पोलिसांवर आरोप करत म्हंटले होते की, आरोपी अवधेश सिंह याच्यावर तक्रारीनंतर देखील पोलीस कोणतीच कारवाई करत नाही. अवधेशवर बलात्कार केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता परंतु नंतर न्यायालयाने त्याला याबाबत जामीन मंजूर केला होता.

उन्नाव पोलीस अधीक्षक विक्रांत वीर यांनी सांगितले की, महिलेचे अवधेश सोबत अनेक दिवसांपासून प्रेम संबंध होते. महिलेने दोन ऑक्टोबर रोजी अवधेश वर लैगिंक शोषण केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/