उपोषणादरम्यान विखेंची सत्ता असलेल्या कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगाराचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – थकीत पगार व अन्य मागण्यांसाठी डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या उपोषणादरम्यान एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या कारखान्यावर खासदार सुजय विखे यांच्या गटाची सत्ता आहे.

सोपानराव पुंजाजी जगधने हे मयताचे नाव आहेत. ते सेवानिवृत्त कामगार आहेत. मंगळवारपासून (दि. १७) राहुरी कारखाना कार्यस्थळावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे शेकडो कामगारांनी थकीत पगार व अन्य मागण्यासाठी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात सेवानिवृत्त कामगार बांधवांचा ग्रॅज्युटी, फंड व इतर मागण्यांसाठी सहभाग घेतला आहे.

या उपोषणात सहभागी झालेले सेवानिवृत्त कामगार सोपानराव पुंजाजी जगधने यांना उपोषणादरम्यान चक्कर येऊन बेशुद्ध पडले. तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/